वरोरा शहरात बुधवारपासून कापूस खरेदीला प्रारंभ

By admin | Published: October 15, 2015 01:05 AM2015-10-15T01:05:16+5:302015-10-15T01:05:16+5:30

शहरा लगतच्या पारस अ‍ॅग्रो प्रोसेसिंगमध्ये बुधवारपासून कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी एक हजार क्विंटल कापसाची आवक झाली.

Start buying cotton from Wednesday in the city of Verora | वरोरा शहरात बुधवारपासून कापूस खरेदीला प्रारंभ

वरोरा शहरात बुधवारपासून कापूस खरेदीला प्रारंभ

Next

पुणे : जागेची भाडेवाढ, वीजदर, महागाई, गुंतवणूक यामध्ये वर्षानुवर्षे वाढ होत आहे. परंतु जे दिवसभर दूध सांभाळून त्यासाठी स्वत:ची गुंतवणूक करतात, त्यांच्या कमिशमनध्ये वाढदेखील करण्यात आली नाही. किरकोळ दूधविक्रेत्यांना वाढत्या महागाईमुळे दूध ठेवणे व त्याची विक्री करणे परवडत नाही. यासाठी दुधाच्या कमिशनमध्ये तत्काळ वाढ करावी, अशी मागणी सिंहगड रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी केली.
दुधाला अनेक वर्षांपासून किरकोळ विक्रीसाठी प्रतिलिटरमागे एक रुपया कमिशन मिळते. म्हणजेच दूध कंपन्यांनी वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ केली असली तरी, जे गुंतवणूक करतात, त्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली
नाही.
तसेच कॅरीबॅग खर्च, विजेचे बिल आणि पूर्वी दूध खराब झाले तर बदलून मिळायचे. आता ते बदलूनही मिळत नाही.
या सर्व गोष्टीला एका विक्रेत्यालाच सामोरे जावे लागत असल्याची कैफियतही त्यांनी मांडली.
२७ आॅक्टोबरपर्यंत दूध कंपन्यांनी निर्णय न घेतल्यास या दिवसापासून कमिशन न वाढवून देणाऱ्या कंपन्यांचे दूध खरेदी केले जाणार नाही आणि त्या दुधाची विक्रीही केली जाणार नाही.
तसेच शहर व उपनगरातील किरकोळ व्यापाऱ्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Start buying cotton from Wednesday in the city of Verora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.