मुळा-मुठा नदी सुधारणा प्रक्रियेस सुरूवात
By Admin | Published: November 10, 2015 01:42 AM2015-11-10T01:42:11+5:302015-11-10T01:42:11+5:30
साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातील मुळा-मुठा नदीच्या किनाऱ्याचे सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रक्रियेस महापालिकेकडून सुरूवात करण्यात आली आहे
पुणे : साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातील मुळा-मुठा नदीच्या किनाऱ्याचे सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रक्रियेस महापालिकेकडून सुरूवात करण्यात आली आहे. एचसीपी डिझाईन या कंपनीकडून हा आराखडा तयार करून घेण्यासाठी ३ कोटी ९६ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे.
नद्यांचे जलशास्त्रीय सर्वेक्षण, नदी विकसनाचे नकाशांबरोबरच शासकीय आणि निमशासकीय विभागाकडील मान्यतेसाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) या अंतर्गत स्थापन करणे आदी कामे एचसीपी डिझाईन कंपनीकडून करून दिली जाणार आहेत.
नदीपात्राचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, खडकी कॅन्टोन्मेंट, पुणे महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सीपीडब्ल्यूआरएस या सर्व विभागांची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. शहरातून मुळा नदीचा १७ किलोमीटर लांबीचा, तर मुठा नदीचा १२ किलोमीटर लांबीचा प्रवाह आहे.
नदी सुधारणेसाठी पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली
आहे. ५ वर्षांच्या कालावधीसाठी
हा प्रस्ताव तयार करण्यात आला
आहे. (प्रतिनिधी)