बंधाऱ्याचे खोलीकरण सुरू
By Admin | Published: March 21, 2017 05:03 AM2017-03-21T05:03:33+5:302017-03-21T05:03:33+5:30
दिवे (ता. पुरंदर) गावाजवळील पवारवाडी येथील उपळी बंधाऱ्याच्या खोलीकरणाच्या कामाची सोमवारी (दि. २०) सुरुवात करण्यात आली.
गराडे : दिवे (ता. पुरंदर) गावाजवळील पवारवाडी येथील उपळी बंधाऱ्याच्या खोलीकरणाच्या कामाची सोमवारी (दि. २०) सुरुवात करण्यात आली. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भारत फोर्ज कंपनी व लोकसहभागातून बंधारा खोलीकरणाचे हे काम होणार आहे. जलक्रांतीचे प्रवर्तक व दिवे ग्रामपंचायतीचे सदस्य पै. सागर काळे यांच्या प्रयत्नातून बंधारा खोलीकरणासाठी आर्थिक साहाय्य दिले आहे.
या वेळी सरपंच नीताताई लडकत, ग्रामपंचायत सदस्य सागर काळे, गुलाब झेंडे, माजी उपसरपंच अशोक पवार, संजय पवार, पुरंदर तालुका काँग्रेस सरचिटणीस रवींद्र पवार, जानूबाई विकास सोसायटीचे चेअरमन रामदास पवार, अमित काळे, भारत फोर्जचे समन्वयक जयदीप
लाड, सहायक देवानंद रोकडे,
मंडल कृषिअधिकारी विक्रम कुलकर्णी, कृषी सहायक अनिल पाटील, एम. आर. कांचन, डी. व्ही. कदम, आर्टिस्ट डी. जी. विटकर,
रामदास लडकत, निवृत्ती पवार, सोमनाथ पवार, शिवाजी
पवार, दत्तात्रय अवताडे, दत्तात्रय
पवार, संग्राम पवार, अनिकेत
पवार, नामदेव पवार, ज्ञानदेव पवार, बेबीताई पवार, मनीषा कुदळे, अनुराधा भोंगळे, उषा पवार,
सारिका अवताडे, कौशल्या पवार, सायली पवार, स्वराली अवताडे आदींसह पवारवाडीकर ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)