पाटस हत्याकांड खटला जलदगती न्यायालयात सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:32+5:302021-07-16T04:09:32+5:30

दौंड : पाटस येथील हत्याकांडातील खटला जलदगती न्यायालयात करण्यात यावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, असेसे मत जय ...

Start the Patas murder case in a speedy court | पाटस हत्याकांड खटला जलदगती न्यायालयात सुरु करा

पाटस हत्याकांड खटला जलदगती न्यायालयात सुरु करा

Next

दौंड : पाटस येथील हत्याकांडातील खटला जलदगती न्यायालयात करण्यात यावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, असेसे मत जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी शोकसभेत व्यक्त केले.

पाटस येथील शिवम शितकल, गणेश माकर या युवकांची निर्घुण हत्या झाली. शितकल आणि माकर कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने दौंड तहसील कार्यालयाच्या परिसरात निषेधसभा घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महीला आणि पुरुष ऊपस्थित होते.

पाटस हत्याकांडातील गुन्हेगारांना पकडले. मात्र, जे फरार गुन्हेगार आहे, त्यांना तातडीने पकडण्यात यावे. महाराष्ट्रातील रामोशी समाजातील कुटुंबांवर प्रस्थापीतांकडून अन्याय केला जातो. भविष्यात आमच्या समाजावर होणारे अत्याचार सहन केले जाणार नाही. शासनाने रामोशी समाजाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण द्यावे अशी मागणी दौलत शितोळे यांनी केली.

यावेळी जय मल्हार क्रांती संघघटनेचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने म्हणाले, पोलीसांनी पाटस हत्याकांडातील तपास योग्य दिशेने करावा. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. पोलीसांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नये.

याप्रसंगी सुरेखा जाधव, तृप्ती भंडलकर, अनिल माखर, आश्वीन वाघमारे,शंकर पवार यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान तहसीलदार संजय पाटील यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .

फोटो : दौंड येथे जय म्ल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पाटस येथील हत्याकांडाचा निषेध करण्यात आला

Web Title: Start the Patas murder case in a speedy court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.