अकरावी प्रवेशाच्या तयारीला सुरुवात
By admin | Published: March 20, 2017 04:42 AM2017-03-20T04:42:09+5:302017-03-20T04:42:09+5:30
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील
पुणे : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीची २0१७-१८ या शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असून कनिष्ठ महाविद्यालयांनी प्राथमिक माहिती लवकरात लवकर कार्यालयास पाठवावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी केले आहे.
शिक्षण विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. यंदा दिल्ली येथील ‘नायसा’ या संस्थेला आॅनलाईन प्रकियेचे काम देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून एमकेसीएलकडून अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जात होती. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांकडून वारंवार प्राथमिक माहिती घ्यावी लागत नव्हती. परंतु, नवीन संस्थेला काम देण्यात आल्यामुळे महाविद्यालय प्रशासनाकडून महाविद्यालयाचे नाव, प्राचार्यांचे नाव अशी प्राथमिक माहिती मागविण्यात आली आहे. महाविद्यालयांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून लॉग इन आयडी दिला जाणार आहे. असे टेमकर यांनी स्पष्ट केले.