पुरंदर उपसा तातडीने सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:43 PM2019-01-08T23:43:56+5:302019-01-08T23:45:11+5:30

गणेश मुळीक : २४ दिवस बंद असल्याने दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिके धोक्यात

Start the pujaran tailings immediately | पुरंदर उपसा तातडीने सुरू करा

पुरंदर उपसा तातडीने सुरू करा

Next

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात ओढा खोलीकरणाच्या कामांना सुरवात झाली असून रिसे-पिसे, राजुरी या गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेतून खोलीकरणाची कामे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मंजूर केल्याची माहिती युवासेनेचे तालुका समन्वयक गणेश मुळीक यांनी दिली.

मुळीक म्हणाले, ‘‘रिसे-पिसेमधील ओढ्यावर असलेल्या सिमेंट नाला बंडिंगमधील गाळ काढण्याची एकूण ७ कामे पूर्ण झाली असून, ६ कामे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी ६ लाख ४२ हजार रुपये खर्च करण्यात येत आहेत. यापूर्वीच्या ७ कामांवर ६ लाख रुपये खर्च झालेले आहेत. त्यामुळे ओढ्याची साठवण क्षमता चांगली वाढणार असून, त्याचा दोन्ही गावांतील शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. जनाई-शिरसाई योजनेच्या पाण्याचा या ओढ्यात साठा केला जातो. राजुरी गावातील ४ खोलीकरणाच्या कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असून, त्यासाठी ८ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात येत आहे. पिसे गावचे सरपंच सोमनाथ मुळीक, रिसेच्या सरपंच नीता कामठे, माजी उपसरपंच मंजुळा हांडे, रमेश हांडे, राजुरीचे उपसरपंच विपुल भगत, माजी उपसरपंच कृष्णाजी भगत, अंकुश भगत व ग्रामस्थांनी या खोलीकरण कामाची मागणी केली होती. त्यानुसार राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हा निधी उपलब्ध करून दिला आहे.

रब्बी पिके धोक्यात, लाभार्थी गावांची मागणी

भुलेश्वर : दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणारी पुरंदर उपसा जलसिंचन योजना गेले २४ दिवस बंद असल्याने दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिके धोक्यात आली आहेत. यामुळे ही योजना तातडीने सुरू करण्याची मागणी लाभार्थी गावांतील शेतकºयांनी केली आहे.

सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे रब्बी हंगामातील पाणी सुरू आहे. राज्यातील अनेक पाणीपुरवठा योजना वीजबिलाच्या थकबाकीमुळे अडचणीत येतात. यामुळे राज्य शासन उपसा सिंचण एकूण वीजबिलाच्या ८१ टक्के भार भरत असून लाभार्थी शेतकरी १९ टक्के रक्कम भरून पाणी घेत आहेत. यामुळे यंदा पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आजतागायत एवढ्या आडचणी कधीच आल्या नाहीत. मात्र, या वर्षी या योजनेचे योग्य नियोजन झाले नाही. यामुळे या योजनेचे तीनतेरा वाजले. योजना एक दिवसही बंद राहणार नसल्याची ग्वाही जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी दिली होती. मात्र, दीपावलीच्या सुटीत ही योजना बंद होती. त्यानंतर शिंदवणे येथे अचानक व्हॉल्व्ह सोडल्याने पुन्हा सुरळीत चालू असणारी योजना बंद पडली. त्यानंतर ५ डिसेंबरला माळशिरस वितरिकेचे पाणी राजेवाडी वितरिकेला दिल्याने जादा पाणी झाल्याने दाब येऊन राजेवाडी वितरिका तुटली. यामुळे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे सुरू असलेले पाणी १५ डिसेंबरपासून बंद झाले. वास्तविक, पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. दुरुस्ती करणाºया विभागाने याकडे पूर्णत: काणाडोळा केला.

नेत्यांच्या शिफारशी; अधिकाºयांची कसरत
1दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाणीमागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पहिले पाणी कोणाला द्यायचे? या प्रश्नावर या योजनेच्या अधिकाºयांची तारेवरची कसरत झाली आहे. यासाठी स्थानिक नेत्यांच्या शिफारशी वाढत चालल्या आहेत.
2 ही योजना बंद असताना कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे गळणारे एअरव्हॉल्व्ह आजतागायत कधीच दुरुस्त होत नाहीत. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. याचा भुर्दंड नियमित पैसे भरणाºया शेतकºयांच्या डोक्यावर पडतो.
3देशात एकमेव इस्राईलच्या धर्तीवर ठिबक सिंचनाचा वापर करून नियोजनात असणाºया या योजनेची उर्वरित कामे पूर्ण करणे गरजेचे आहे.
4मुळा-मुठा नदीतून येणारे पाणी शुद्धीकरण करून ठिबक सिंचनाखाली आणून शेती करणे गरजेचे आहे. यामुळे आजही वंचित राहिलेले क्षेत्र ओलिताखाली येईल.

Web Title: Start the pujaran tailings immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे