कारागिरांची धावपळ सुरू
By admin | Published: August 31, 2015 04:02 AM2015-08-31T04:02:58+5:302015-08-31T04:02:58+5:30
विघ्नहर्त्या गणरायाचा उत्सव जवळ येऊ लागला, तसतशी कारागिरांची धावपळ होत असून, मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. पंधरा दिवसावर
पिंपळे गुरव : विघ्नहर्त्या गणरायाचा उत्सव जवळ येऊ लागला, तसतशी कारागिरांची धावपळ होत असून, मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. पंधरा दिवसावर येऊन ठेपलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे. मूर्तिकार गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. विक्रीसाठी बहुतांश मूर्ती तयार झाल्या असून, बुकिंगही झाल्या आहेत. सध्या मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांची संख्या कमी झाली आहे. राज्यात व शहरात ही संख्या खूप कमी झाल्यामुळे मूर्तिकारांना परराज्यांतून कारागीर बोलवावे लागतात. मूर्तीमध्ये प्रामुख्याने दगडूशेठ हलवाई, लालबागचा गणपती या मूर्तीना मागणी आहे. मूर्तींमध्ये ५० हून अधिक विविध प्रकार आहेत. त्यामध्ये मयूरावर आरूढ, शिंपल्यावरील, विविध फुलांवर-प्राण्यांवर बसलेल्या अशा मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचे काम कारखान्यात सुरू आहे.