भाटघर, नीरा देवघर धरणभागात टॅँकर सुरू करा

By admin | Published: March 28, 2017 02:08 AM2017-03-28T02:08:27+5:302017-03-28T02:08:27+5:30

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ३२ टक्के, तर नीरा देवघर धरणात

Start the tanker in Bhatghar, Neera Devghar dam building | भाटघर, नीरा देवघर धरणभागात टॅँकर सुरू करा

भाटघर, नीरा देवघर धरणभागात टॅँकर सुरू करा

Next

भोर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ३२ टक्के, तर नीरा देवघर धरणात २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दोन्ही धरणभागात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. टॅँकर सुरू करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
बारामती व फलटण तालुक्यातील डाव्या व उजव्या कालव्यांना शेतीसाठी १० मार्चपासून नीरा देवघर धरणातून ७६० क्युसेक्सने व भाटघर धरणातून २००० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे.
भोर तालुक्यात मागील वर्षी भाटघर व नीरादेवघर दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. मात्र अडीच महिन्यांपासून धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली सोडल्याने भाटघर धरणातील पाणीसाठा ३२ टक्क्यांवर आला आहे. नीरादेवघर धरणातही २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
पावसाळा सुरू होण्यास अद्याप अडीच महिने बाकी आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. (वार्ताहर)

पाण्यासाठी दिवसभर पायपीट सुरू
नीरा देवघर धरण भागातील रिंगरोड धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, निवंगण, धानवली, शिरवली हि. मा, चौधरीवस्ती, मानटवस्ती व महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाईवस्ती, सुईरमाळ, कारुंगण यांसह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे.
जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने गावापासून ३ किलोमीटरवर असलेल्या धरणातून पाणी आणण्याशिवाय महिलांकडे कोणताच पर्याय नसल्याने पाण्यासाठी दिवसभर पायपीट सुरू आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात हेच काम महिलांना करावे लागत आहे.

भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरी कोरड्या पडत असल्याने हर्णस, जोगवडी, आस्कवडी, डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कुरुंजी यांच्यासह अनेक गावांतील विहिरीतील मोटार बंद पडत आहेत. त्यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अनेकदा गाळमिश्रीत पाणीपुरवठा होत आहे. दोन मोटारमुळे वीज बिल अधिक प्रमाणात येत आहे. नवीन पाईप घेणे त्याला वायर व मजुरी ही कामे दरवर्षी उन्हाळ््यात करावी लागतात. मात्र हे ग्रामपंचायतींना परवडत नाही.
- ज्ञानेश्वर नलावडे, उपसरपंच, कुरुंजी

Web Title: Start the tanker in Bhatghar, Neera Devghar dam building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.