टँकर, चारा छावण्या सुरू करा

By admin | Published: April 25, 2017 03:48 AM2017-04-25T03:48:56+5:302017-04-25T03:48:56+5:30

इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी मिळावे, ३५ गावांना पाण्याचे टँकर सुरू व्हावेत, जनावरांसाठी चारा आणि चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत

Start the tanker, fodder camps | टँकर, चारा छावण्या सुरू करा

टँकर, चारा छावण्या सुरू करा

Next

इंदापूर : इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी मिळावे, ३५ गावांना पाण्याचे टँकर सुरू व्हावेत, जनावरांसाठी चारा आणि चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत आदी महत्त्वाच्या मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि. २ मे) तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा महामोर्चा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, की भाटघर, खडकवासला या धरणांतील इंदापूरकरांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळालेच पाहिजे. नीरा डावा कालव्याचे आवर्तन मिळाले पाहिजे. या वर्षी उजनी धरण ११० टक्के भरलेले असताना अमाप पाणी सोडण्यात आल्याने सध्या धरणाची पातळी शून्यावर आली आहे. तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना उचल पाण्याचा हक्क अबाधित राहिला पाहिजे. तालुक्यातील ३५ टंचाईग्रस्त गावांत टँकर सुरू झाला पाहिजे. जनावरांसाठी पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे. चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत, अशा येथील शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत.
भाटघर व खडकवासला धरणांतून इंदापूर तालुक्यासाठी मिळणारे हक्काचे पाणी दुसऱ्या बारामती व दौंड तालुक्यांनी पळविले. त्यामुळे तिकडे हिरवळ, तर इकडे वाळवंट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला, भाटघर व नीरा डावा कालव्याचे आवर्तन मिळणे गरजेचे होते. खडकवासला व भाटघर धरणे पावसाळ्यात दोन वेळा भरली. उजनी ११० टक्के भरले होते. सध्या भाटघर धरण ४५ टक्के व खडकवासला धरण ३५ टक्के पाणीसाठा आहे. उजनी धरण मात्र झपाट्याने कोरडे होत आहे.
कालवा सल्लागार समितीमध्ये प्रत्येक तालुक्याचा लोकप्रतिनिधी असतो. त्याने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असते. दौंड तालुक्यातील तलाव भरले आहेत. इंदापूर तालुक्यातील स्थिती विदारक आहे. तालुक्यातील तरंगवाडी तलावापासून मदनवाडी तलावापर्यंत २२ तलावांत पाणी सोडले गेले नाही. तरंगवाडी तलाव हा इंदापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आरक्षित केला आहे. या तलावावरून गोखळी, गलांडवाडी, तरंगवाडी, झगडेवाडी आदी गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना आहेत. अशी वस्तुस्थिती असताना अद्याप तलावात पाणी सोडण्यात आलेले नाही. उलट, इंदापूर नगर परिषदेला तरंगवाडी तलावातील पाण्याची गरज नसल्याचे पत्र पाटबंधारे विभागाने मागितले आहे. सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

Web Title: Start the tanker, fodder camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.