भोर, वेल्हा व मुळशी भागात ट्रामा सेंटर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:13 AM2021-09-15T04:13:56+5:302021-09-15T04:13:56+5:30

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे मागणी नसरापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि वेल्हा तालुक्यातील नागरिकांसाठी नसरापूर या मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालय ...

Start Trauma Centers in Bhor, Velha and Mulshi areas | भोर, वेल्हा व मुळशी भागात ट्रामा सेंटर सुरू करा

भोर, वेल्हा व मुळशी भागात ट्रामा सेंटर सुरू करा

googlenewsNext

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

नसरापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि वेल्हा तालुक्यातील नागरिकांसाठी नसरापूर या मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर, मुळशी तालुक्यासाठी पिरंगुट येथे ट्रामा केअर सेंटर उभारावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

टोपे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देत शिवतरे यांनी त्यांच्याशी तिन्ही तालुक्यांतील आरोग्यसेवेसंदर्भात सविस्तर चर्चा केली. भोर तालुक्यातील हिर्डोशी, भुतोंडे व उपकेंद्र रायरी; वेल्हा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पानशेत व उपकेंद्र दापोडे या ठिकाणी आरोग्य केंद्र व उपकेंद्राची ८० टक्के बांधकामे झाली आहेत. तथापि, येथे आरोग्य कर्मचाऱ्यांची अद्याप नेमणूक झाली नाही. त्यामुळे रुग्णसेवेत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे येथे लवकरात लवकर कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केल्याचे शिवतरे यांनी सांगितले. याशिवाय भोर तालुक्यातील नसरापूर या मध्यवर्ती ठिकाणी भोर व वेल्हा तालुक्यातील नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर उभारावे हा मुद्दा आरोग्यमंत्र्यांकडे मांडला आहे, तसेच मुळशी तालुक्यासाठी पिरंगुट येथे ट्रामा केअर सेंटर उभारावे अशी मागणीही केली आहे. या भागातून रायगड किल्ला आणि जिल्ह्यात अन्यत्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. शिवाय पिरंगुट हे मुळशी तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे येथे रुग्णालय होणे गरजेचे असल्याचे त्यांनी टोपे यांच्या लक्षात आणून दिले आहे.

आरोग्यमंत्र्यांकडून कार्यवाहीचे आश्वासन

यासंदर्भातील ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला असून, त्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यताही देण्यात आल्याचे रणजित शिवतरे यांनी सांगितले. आपले म्हणणे टोपे यांनी सविस्तर ऐकून घेत कार्यवाहीचे आश्वासन दिल्याचे रणजित शिवतरे यांनी सांगितले. टोपे यांनी आरोग्य सचिवांना लागलीच याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे शिवतरे म्हणाले.

140921\img-20210911-wa0046__01.jpg

??? ,?????? ? ????? ????? ?????? ????? ???? ???.

?????????? ?????? ???????????? ?????

Web Title: Start Trauma Centers in Bhor, Velha and Mulshi areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.