विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:34 AM2021-01-08T04:34:39+5:302021-01-08T04:34:39+5:30

आंबेगाव तालुक्यात २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास उभे राहिलेल्या उमेदवारांची गैरसोय होवू नये म्हणून ग्रामपंचायत ...

Start a window room for various permissions | विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्ष सुरू

विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्ष सुरू

googlenewsNext

आंबेगाव तालुक्यात २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास उभे राहिलेल्या उमेदवारांची गैरसोय होवू नये म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणा-या परवानगीसाठी एक खिडकी कक्ष तीन ठिकाणी तहसील कार्यालयात सुरू केली आहे.

गावडेवाडी, शिरदाळे, जवळे, काठापुर बु., खडकी, रानमळा, लांडेवाडी-पिंगळवाडी, काळेवाडी-कोटमदरा व महाळुंगे पडवळ या ग्रामपंचायतींसाठी ए. बाळसराफ, रोहन डावरे यांची एक खिडकी कक्षाकरिता नियुक्ती केली आहे.

गिरवली, काळेवाडी-दरेकरवाडी, धोंडमाळ-शिंदेवाडी, कोलदरा-गोनवडी, पिंपळगावतर्फे म्हाळुंगे, अवसरी खुर्द व मंचर यासाठी कृषी अधिकारी पाटोळे व योगेश सोनवणे यांची नियुक्ती तर शेवाळवाडी, एकलहरे, पेठ, थुगांव, लौकी, शिंगवे, भागडी, खडकी व वळती या ग्रामंपचायतींसाठी एस. एस. वांगसकर, सुनील रोकडे यांची एक खिडकी कक्षासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.

Web Title: Start a window room for various permissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.