रिंगरोडचे काम तातडीने सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:24+5:302021-06-24T04:09:24+5:30

--- शिक्रापूर : पीएमआरडी हद्दीतील गावातील होत असलेल्या नागरिकीकरणाच्या जमीनींना नव्याने होत असलेल्या विकास आराखड्यात रहिवास झोनमध्ये घ्यावे व ...

Start work on the ring road immediately | रिंगरोडचे काम तातडीने सुरु करा

रिंगरोडचे काम तातडीने सुरु करा

Next

---

शिक्रापूर : पीएमआरडी हद्दीतील गावातील होत असलेल्या नागरिकीकरणाच्या जमीनींना नव्याने होत असलेल्या विकास आराखड्यात रहिवास झोनमध्ये घ्यावे व रिंगरोडचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी पुणे जिल्हा विकास मंच व सामाजिक संघटना यांनी पीएमआरडीचे आयुक्त डॉ. सुहास दिवटे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

मंगळवारी झालेल्या या बैठकीत विविध मागण्या करत हद्दीत झोन बदलाचे सरचार्ज कमी करावेत, याबाबत निवेदन दिले असून आयुक्तांनी सकारात्मकता प्रतिसाद दिला असल्याचे पुणे जिल्हा विकास मंचचे अध्यक्ष सदाशिव पवार यानी सांगितले. पीएमआरडीचा विकास आराखडा पुढील एक महिन्याच्या आत तयार होईल व तद‌्नंतर प्रसिद्ध होईल व त्यावर सूचना मागवून त्वरित अंमलबजावणी होईल अशी माहिती आयुक्तांनी दिली असल्याचे पवार यांनी सांगितले.

दरम्यान काम होईपर्यंत पुणे जिल्हा विकास मंचच्या व विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु ठेवणार असल्याचे सुमन लोकसेवा संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा विकासमंच चे अध्यक्ष सदाशिव आण्णा पवार, कार्याध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुंडलिक, खजिनदार श्रीपतराव नवले, शिरुर तालुका अध्यक्ष पी. के. गव्हाणे, महिला कमिटीच्या मंदाकिनी पाटील, सदस्य बबनराव जाधव, ॲड. गायकवाड दिलीपराव बेंद्रे आदी उपस्थित होते.

--

फोटो क्रमंक : २३ शिक्रापूर रिंगरोड मागणी

फोटो : पीएमआरडी हद्दीतील गावांच्या विविध मागण्यांचे निवेदन देताना सामाजिक संघटनेचे पदाधिकारी

===Photopath===

230621\23pun_6_23062021_6.jpg

===Caption===

फोटो क्रमंक : २३ शिक्रापूर रिंगरोड मागणीफोटो : पीएमआरडी हद्दीतील गावांच्या विविध मागण्यांचे निवेदन देतांना सामाजिक संघटनेचे पदाधिकारी

Web Title: Start work on the ring road immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.