पुण्यात स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन सुरु : पहिला गुन्हा डेटा चोरीचा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 06:38 PM2019-06-18T18:38:05+5:302019-06-18T18:39:46+5:30
दिवसेंदिवस वाढणाऱ्या सायबर शाखेच्या गुन्ह्यांची संख्या बघता शहरात उभारण्यात आलेल्या पहिल्या सायबर पोलीस स्टेशनच्या कामाला सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर भागात उभारण्यात आलेल्या या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पहिला गुन्हा नोंद झाला आहे.
पुणे : दिवसेंदिवस वाढणाऱ्या सायबर शाखेच्या गुन्ह्यांची संख्या बघता शहरात उभारण्यात आलेल्या पहिल्या सायबर पोलीस स्टेशनच्या कामाला सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर भागात उभारण्यात आलेल्या या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पहिला गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १८ ऑक्टोबर २०१८ रोजी पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांच्या हस्ते शिवाजीनगर पोलीस हेडक्वार्टरच्या आवारात सायबर पोलीस स्टेशनचे उदघाटन झाले. मात्र इथे दाखल होणाऱ्या गुन्ह्यासाठी न्यायालय मंजूर नसल्याने कामाला सुरुवात झाली नव्हती. याआधी सायबर गुन्हा घडल्यास ती तक्रार संबंधित पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नोंदवण्यात यायची आणि तिचा तपास सायबर शाखेकडून केला जात असे. आता मुख्य न्यायाधीशांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट नंबर ६ यांची नेमणूक केल्याने आता या पोलीस स्टेशनमध्येच सायबर गुन्हयाची नोंद करण्यात येईल. या कामकाजाला आज पहिला गुन्हा नोंदवून सुरुवात झाली असल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी कळवले आहे.आज दाखल झालेला पहिला गुन्हा डेटा चोरीचा आहे.