१० कोटींच्या कामांना सुरुवात
By admin | Published: March 30, 2016 02:08 AM2016-03-30T02:08:06+5:302016-03-30T02:08:06+5:30
टंचाई परिस्थिती लक्षात घेता यावर्षी जिल्हा परिषदेने जानेवारीत ४० कोटी ९१ लाखांचा टंचाईकृती आराखडा तयार केला असून त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी घेतली होती. यापैकी १० कोटी
पुणे : टंचाई परिस्थिती लक्षात घेता यावर्षी जिल्हा परिषदेने जानेवारीत ४० कोटी ९१ लाखांचा टंचाईकृती आराखडा तयार केला असून त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी घेतली होती. यापैकी १० कोटी ११ लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली असून कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे प्रस्तावित नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीतून ९२ योजनांची दुरुस्ती करण्यात आली असून यासाठी ८ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
या वर्षी टंचाईची परिस्थिती पाहता तीन महिने अगोदरच टंचाई आराखडा मंजूर झाला होता. यानंतर तातडीची बैैठक घेऊन विंधन विहिरींचा सर्व्हे करताना सर्वांना बरोबर घ्या... टंचाईकाळात ग्रामसेवक गावातच थांबवा... डे टू डे रिपोर्ट करा... जिल्हा परिषदेत टंचाई कक्ष तत्काळ सुरू करा... आणि मतदभेद बाजूला ठेवून ग्रामस्थांनी एकत्रितपणे टंचाईचा सामना करावा... आदी महत्त्वपूर्ण सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केल्या होत्या.
यानुसार टंचाई कक्षाची स्थापना करून हे काम सुरू झाले होते. यातून आतापर्यंत १०४ नवीन विंधन विहिरींना मंजुरी दिली असून यासाठी ५८ लाखांच्या निधीस मंजुरी दिली आहे. यापैकी ५८ विहिरींसाठी खोदाई केली असून ४७ ठिकाणी पाणी लागले आहे. विंधन विहीर दुरुस्तीतून ३६० दुरुस्तींना मंजुरी मिळाली असून यासाठी ८३ लाखांचा निधी दिला आहे. यातील १३८ कामे पूर्ण झाली आहेत. (प्रतिनिधी)