निरेत कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:11 AM2021-05-09T04:11:40+5:302021-05-09T04:11:40+5:30
या वेळी पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, पुरंदरच्या तालुका ...
या वेळी पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, पुरंदरच्या तालुका वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला जाधव, मेडिकल असो. डॉ. राम रणनवरे, तलाठी बजरंग सोनवले, ग्रामसेवक मनोज डेरे प्रत्यक्ष उपस्थित होते. ऑनलाइन असलेल्या या कार्यक्रमाला पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण, दत्ताजीराव चव्हाण, जिल्हा परिषदच्या सदस्य शालिनी पवार, हेमंत माहुरकर, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, ऋतूजा धुमाळ, ज्युबिलंटचे उपाध्यक्ष सतीश भट, इसाक मुजावर, तहसीलदार रुपाली सरनोबत यांसह तालुक्यातील ५८ लोकांनी सहभाग दर्शवला.
नीरा शहारामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अनेक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहेत. मात्र, असे रुग्ण गावातून फिरताना आढळून आले. कमी धोका असलेल्या रुग्णांना घरात कमी जागा असल्याने अडचणी येत होत्या. त्यामुळे ज्यांचा कोरोना अहवाल बाधित आला आहे. मात्र त्यांना कोणताही त्रास नाही अशा लोकांसाठी विलगीकरण कक्ष किंवा कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. पुरंदरचे आमादर संजय जगताप यांनी या मागणीनुसार येथे कोविड विलगीकारण कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. आमदारांनी दिलेला निधी, तसेच नीरा येथील ज्युबिलंट कंपनीने केलेली मदत यामुळे आजपासून येथे कोविड विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला.
दरम्यान, अखिल शिवजयंती उत्सव समिती, मुस्लिम समाजबांधव, आई पतसंस्था, समर्थ पतसंस्था, ग्रामपंचायत सदस्य संदीप धायगुडे, अनिल चव्हाण यांसह काही दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदती जाहीर केल्या. तर जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भय्यासाहेब खाटपे यांनी नीरा आणि वीर येथील विलगीकारण कक्षास प्रत्येकी एक हजार अंडी देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपसरपंच राजेश काकडे यांनी केले, तर सदस्य संदीप धायगुडे यांनी आभार मानले.