पाबळ येथे उभारणार अत्याधुनिक स्मशानभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:12 AM2021-09-27T04:12:24+5:302021-09-27T04:12:24+5:30
पाबळ स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. लोकसहभागातून तसेच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या निधीतून व काही उद्योजकांच्या ...
पाबळ स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. लोकसहभागातून तसेच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या निधीतून व काही उद्योजकांच्या सहकार्याने सुमारे ८० लाख रुपये खर्चून या ठिकाणी स्मशानभूमी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती पाबळचे सरपंच मारुती शेळके यांनी दिली. यावेळी उपसरपंच राजेंद्र वाघोली, ग्रामपंचायत सदस्य सोपान जाधव, सचिन वाबळे, डी. के. घाटकर, शशिकला जाधव, रोहिणी चव्हाण, मीरा नर्हे, मनीषा आगरकर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान घोडेकर, अरुण चौधरी, संचालक जे. जे. जाधव, दत्तात्रय सिनलकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - पाबळ तालुका शिरूर येथे अद्ययावत अशा स्मशानभूमीचा आराखडा. (धनंजय गावडे)