‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 07:08 AM2024-09-30T07:08:11+5:302024-09-30T07:08:25+5:30
पूर्वप्राथमिक वर्गांसाठी किती शैक्षणिक शुल्क आकारावे; तसेच या शाळांमध्ये काय साेयी-सुविधा असाव्यात, याबाबत समिती स्थापन केली असून, अहवाल प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील पूर्वप्राथमिक वर्गातील वय ३ ते ६ वर्षे वयाेगटातील बालकांच्या शिक्षणासंदर्भात राज्य शासनाने धाेरण तयार केले आहे. पूर्वप्राथमिक वर्गासाठीचा अभ्यासक्रम तयार झाला असून, पुस्तकांची छपाई पूर्ण केली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पूर्वप्राथमिक वर्गांसाठी किती शैक्षणिक शुल्क आकारावे; तसेच या शाळांमध्ये काय साेयी-सुविधा असाव्यात, याबाबत समिती स्थापन केली असून, अहवाल प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
शाळांवर नियमन राहणार
राज्यात पूर्वप्राथमिक शाळांवर शिक्षण तसेच महिला व बालकल्याण या दाेन्ही विभागांचे नियंत्रण नाही. त्यामुळे नर्सरी शाळांचे पेव फुटले आहे. या शाळांमध्ये मनमानी शुल्क आकारले जाते; साेयी-सुविधा दिल्या जात नाहीत. त्या पार्श्वभूमीवर शाळांवर नियमन करण्यासाठी धाेरण तयार केले आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखडा अंतिम
nतिसरी ते बारावी अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी मसुदा प्रसिद्ध करण्यात आला हाेता. त्यावर सुमारे चार हजार तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. त्याचे तज्ज्ञ समितीकडून खंडन करण्यात आले.
nराज्य अभ्यासक्रम आराखडा अंतिम केला आहे. पुस्तके तयार करण्यात येतील आणि पुढील शैक्षणिक वर्षांपासून त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.