राज्यसरकारचे महापालिकेला सहकार्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:11 AM2021-04-23T04:11:43+5:302021-04-23T04:11:43+5:30
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी सांगितले की, दोन दिवसांपू्र्वी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने विकासकामाच्या निधीतून ३५० कोटी रुपये बाजूला ...
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी सांगितले की, दोन दिवसांपू्र्वी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने विकासकामाच्या निधीतून ३५० कोटी रुपये बाजूला काढले आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य सुविधा देणार का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
पाटील म्हणाले की, सध्या रुग्णांची संख्या खूप वाढत आहे. ते कोणाच्या हातात नाही, अशात काळजी घ्यायला हवी. सध्याची परिस्थिती पाहता या कोविड सेंटरकडून लोकांची चांगली सेवा होईल, अशा शुभेच्छा मी देऊ शकतो, पण हे कोविड सेंटर जास्त काळ चालावे अशा शुभेच्छा मी देणार नाही.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर माऊली गार्डन येथे आनंद हॉस्पिटल धनकवडी व कात्रज-कोंढवा रोड विकास प्रतिष्ठान संचलित ४० बेड्सचे कोविड केअर सेंटर स्थानिक नगरसेविका मनीषा कदम यांच्या प्रयत्नांतून चालू करण्यात आले आहे. याठिकाणी ४०पैकी ३० ऑक्सिजन, तर १० क्वारंटाईन बेड्सचे नियोजन करण्यात आले असून, नागरिकांसाठी अल्पदरात ते उपलब्ध करण्यात आले आहेत. यावेळी नगरसेविका रंजना टिळेकर, राणी भोसले, वृषाली कामठे, नगरसेवक वीरसेन जगाताप, अशोकानंद कंवर महाराज, राजाभाऊ कदम उपस्थित होते.
फोटो ओळ: कात्रज कोंढवा रस्त्यावर माऊली गार्डन येथे कोविड सेंटरचे उद्घाटन करताना डावीकडून चंद्रकांत पाटील,राजाभाऊ कदम,मनीषा कदम.