राज्य सरकार वारकऱ्यांना झुलवत ठेवतंय : भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 06:06 PM2021-06-19T18:06:49+5:302021-06-19T18:07:34+5:30

राज्य सरकारने बार, दारु मालकांचे धंदे सुरु करताना अशा बैठका घेतल्या होत्या का ?

State government keep on waiting to Warakari : BJP leader Gopichand Padalkar's attack | राज्य सरकार वारकऱ्यांना झुलवत ठेवतंय : भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल 

राज्य सरकार वारकऱ्यांना झुलवत ठेवतंय : भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल 

Next

बारामती: राज्य शासन वारकऱ्यांच्या बैठका घेत त्यांना झुलवत ठेवत आहे. बार, दारु मालकांचे धंदे सुरु करताना सरकारने अशा बैठका घेतल्या होत्या का ? हे वसुली सरकार महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी व हिंदू सण-समारंभावेळीच कोरोनाचे निमित्त काढते आहे. औरंगजेबाच्या काळात संभाजी महाराजांनी वारीला संरक्षण दिले होते. मग छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे नाव घेवून हे सरकार औरंगजेबासारखे काम का करतेय ? बहुजनांच्या भावनांच्या विरोधात जात सरकारने पायी सोहळ्याला परवानगी नाकारली. परंतू, ३ जुलैपासून काही वारकरी आळंदीपासून पायी वारीला निघणार आहेत.  एक दिवस या पायी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी(दि १९) बारामती तालुक्यात विविध समाजातील प्रतिनिधींबरोबर घोंगडी बैठका घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवारांवर टीका केली. पडळकर म्हणाले,राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे काही गोष्टी राजकारणात घडल्या.राज्य सरकारकडूनच सामाजिक सलोखा बिघडेल असं वर्तन सुरु आहे. जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आघाडी सरकारच्या माध्यमातुन विविध मंत्र्यांच्या प्रतिक्रियांमधून होत आहे.मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत राज्य शासन गंभीर नाही.ओबीसी राज़किय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.त्या ओबीसी ३४६ जातींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे पडळकर म्हणाले.

धनगर आरक्षणच्या बाबतीत १०० टक्के विरोधात राज्य सरकार आहे.तत्कालीन सरकारने आदीवासींच्या २२ योजना धनगर समाजाला लागु केल्या होत्या.विविध सवलती या माध्यमातुन समाजाला जाहिर केल्या होत्या.महाविकास आघाडी सरकारने १००० कोटी मागील धरलेले नाहित.तर या वर्षीचे १००० हजार कोटी दिलेले नाहित.समाजाचे एकुण २ हजार कोटीचे नुकसान दिलेले नाही. मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे पहिल्यापासून काम करत आहेत. ते भाजपचे म्हणून नव्हे तर समाजाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असल्याचेही पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना थेट आव्हान.... 
अजित पवार यांना मी आव्हान देतो की, बारामतीकरांनी मागील विधानसभेला माझे डिपॉझिट जप्त केले, हा विषय शिळा झाला. स्वत:च्या जिल्ह्यात अजित पवार यांचा मुलगा लोकसभेला दीड, दोन लाखाने पराभूत झाला. निवडणुकीआधी अवघ्या १५ दिवसांपूर्वी पक्षाने मला बारामतीतून लढण्यास सांगितले. पवार यांनी निवडणुकीच्या आधी १५ दिवस आधी फॉर्म भरून अजित पवारांच्यात हिम्मत असेल तर आटपाडीमधून स्थानिक नेत्यांचा पाठिंबा न घेता लढवावी. तर माझ्यासारखीच अवस्था त्यांची होईल.माझा पराभव त्याचवेळी मी मान्य केला आहे. त्याच विषयांवर पवार यांनी बोलु नये. ते तणावात असल्यासारखे वाटतात. मराठा, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण याविषयावर त्यांनी बोलावे असेही पडळकर यावेळी म्हणाले.

Web Title: State government keep on waiting to Warakari : BJP leader Gopichand Padalkar's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.