मुस्लीम युवकांच्या बेरोजगारीकडे राज्यासरकारचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:07 AM2021-06-23T04:07:59+5:302021-06-23T04:07:59+5:30
राज्यातील सरकार सर्वधर्म समभावाची हाक देत आघाडी करणारे सरकार मुस्लीम युवकांच्या बेरोजगारी कडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याची भावना समाजाची ...
राज्यातील सरकार सर्वधर्म समभावाची हाक देत आघाडी करणारे सरकार मुस्लीम युवकांच्या बेरोजगारी कडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याची भावना समाजाची होत आहे. ही भावना सरकारला समजावी आणि समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार दरबारी कार्यवाही व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांना एक युवक एक पोस्ट कार्ड मोहीम राबवली जात असल्याचे रियाझ शेख यांनी सांगितले. भिगवण पोस्ट कार्यालयापासून या मोहिमेला सुरवात करण्यात आली. या प्रसंगी रियाज शेख, आसिफ बागवान, अस्लम मुलाणी, फिरोज बागवान, आमीर शेख, तौफिक बागवान, सोहेल शेख, समीर शेख, मोहसीन सातारे यांनी निवेदन दिले.
आघाडीच्या सरकारने मुस्लीम समाजासाठी आरक्षण दिले होते आणि त्याच आघाडीतील दोन मित्र पक्ष आताच्या महाविकास आघाडीत असूनही आरक्षण बाबतीत गांभीर्याने विचार होत नसल्यामुळे मुस्लीम समाजावर मोठा अन्याय केला जात असल्याची भावना यावेळी मुस्लीम तरुणांनी बोलून दाखवली.