राज्य आरोग्य विभागास लस वाहतुकीसाठी मिळाली वातानुकूलित ‘वॅक्सीन व्हॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:11 AM2021-03-27T04:11:56+5:302021-03-27T04:11:56+5:30

आरोग्य संचालनालय येथे या वातानुकूलित ''वॅक्सीन व्हॅन''चे आरोग्य विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक (परिवहन ...

State health department gets air-conditioned 'vaccine van' for vaccine transport | राज्य आरोग्य विभागास लस वाहतुकीसाठी मिळाली वातानुकूलित ‘वॅक्सीन व्हॅन’

राज्य आरोग्य विभागास लस वाहतुकीसाठी मिळाली वातानुकूलित ‘वॅक्सीन व्हॅन’

Next

आरोग्य संचालनालय येथे या वातानुकूलित ''वॅक्सीन व्हॅन''चे आरोग्य विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक (परिवहन आरोग्य सेवा) मिलिंद मोरे, राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील, डॉ. सचिन देसाई, युनिसेफ लसीकरण सल्लागार डॉ. सतीश डोईफोडे, ''एचपीएमडीआय''चे प्राचार्य प्रवीण कुमार, ''एचपीसीएल'' पुणेचे वरिष्ठ क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक मंगेश डोंगरे, मानव संसाधन विभागाचे सहायक प्रबंधक अंकुर पारे, शीला रवीकुमार आदी उपस्थित होते.

प्रवीण कुमार म्हणाले, ‘‘या वातानुकूलित ट्रकची किंमत सुमारे ४० लाख रुपये आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार विविध उपक्रम राबवीत आहे. त्यानुसार अनेक संस्था, संघटना विविध उपक्रम राबवून आपले योगदान देत आहेत. त्यानुसार ''एचपीसीएल''कडून हा वातानुकूलित व्हॅक्सिन व्हॅन राज्य सरकारच्या आरोग्य विभागास भेट देण्यात आले. अजून काही राज्यांना अशी व्हॅन देण्यात येणार आहे. देशाला निरोगी बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’’

डॉ. पंकज शर्मा म्हणाले, ‘‘डिसेंबरपासून उपक्रम सुरू आहे. युद्धपातळीवर काम करून या वातानुकूलित ट्रक लस पुरविण्यासाठी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात आली. नागरिकांना वेगाने लस उपलब्ध होण्यात त्याचा मोलाचा हातभार लागेल. लसीकरणाच्या बाबतीतील गैरसमज बाजूला सारून प्रत्येकाने लस टोचून घ्यायला हवी. त्यातून देश कोरोना संकटातून मुक्त होण्यास मदत होईल. या कामात माध्यमात पुढाकार घ्यावा.’’ मिलिंद मोरे यांनीही मनोगत मांडले. अंकुर पारे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

----

डॉ. दिलीप पाटील म्हणाले, "लसीचे पुरवठादार व लाभार्थी यामधील शीतसाखळी संतुलित ठेवणे महत्वाचे असते. या उपक्रमामुळे लसीकरण मोहिमेस बळ मिळेल. १ एप्रिलपासून ४५ वर्षांपासून सर्वाना लस दिली जाणार असल्याने, मोठ्या प्रमाणात लसीची वाहतूक करावी लागणार आहे. अशावेळी हे व्हॅक्सिन व्हॅन उपयुक्त ठरेल. कोरोना लसीनंतर भविष्यात इतर प्रकारच्या लसीच्या वाहतुकीलाही याचा लाभ होईल."

Web Title: State health department gets air-conditioned 'vaccine van' for vaccine transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.