अनिल बगाटे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:10 AM2021-04-03T04:10:33+5:302021-04-03T04:10:33+5:30

वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे बगाटे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून राज्यशासनाच्या निर्णयानुसार ग्रामविकास, ग्रामस्वच्छता, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, विकास योजना, उपक्रम, ...

State level Adarsh Gram Sevak Award to Anil Bagate | अनिल बगाटे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

अनिल बगाटे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार

Next

वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे बगाटे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून राज्यशासनाच्या निर्णयानुसार ग्रामविकास, ग्रामस्वच्छता, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, विकास योजना, उपक्रम, मिळकतकर वसुली अशा सर्व पातळ्यांवर सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील एकाची निवड करण्यात येते. सन २०१९-२० मध्ये बगाटे याची निवड झाली आहे.

बगाटे कृषीपदवी असून २००४ मध्ये मुरबाड (जि. ठाणे) येथून ग्रामसेवक म्हणून सेवेस सुरवात केली. माल्हेड, मुरबाड, फुलगाव आणि वाडेबोल्हाई आदी गावात काम करुन गावातील प्रत्येक माणूस केंद्रस्थानी माणून कामाच्या योजना केल्या.विविध उपक्रम राबवले. त्यांना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, पर्यावरण संतुलन पुरस्कार आदी पुरस्काराने गौरविण्यात आले.

राज्य शासनाच्या यशवंत पंचायत अभियान पुरस्कार वितरण कार्यक्रममध्ये ग्रामविकास मंत्री याच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

Web Title: State level Adarsh Gram Sevak Award to Anil Bagate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.