राज्यस्तरीय स्पर्धा : बॉल बॅडमिंटनमध्ये पुणे विभागाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 03:03 AM2018-11-04T03:03:14+5:302018-11-04T03:03:43+5:30

स्पर्धेतील यशापयश खेळाडू खिलाडू वृत्तीने स्वीकारतो, म्हणून तो जीवनात यशस्वीपणे वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्र वारी राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेच्या बक्षीस व समारोप समारंभाप्रसंगी केले.

State Level Competition: Ball Badminton, Pune Division Domination | राज्यस्तरीय स्पर्धा : बॉल बॅडमिंटनमध्ये पुणे विभागाचे वर्चस्व

राज्यस्तरीय स्पर्धा : बॉल बॅडमिंटनमध्ये पुणे विभागाचे वर्चस्व

Next

अलिबाग : स्पर्धेतील यशापयश खेळाडू खिलाडू वृत्तीने स्वीकारतो, म्हणून तो जीवनात यशस्वीपणे वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्र वारी राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेच्या बक्षीस व समारोप समारंभाप्रसंगी केले. स्पर्धेत पुणे विभागाने १४ वर्षांखालील मुली व १९ वर्षांखालील मुले संघाने प्रथम क्रमांक, तर १९ वर्षांखालील मुलींच्या गटात तृतीय क्र मांक संपादन करून आपले वर्चस्व सिद्ध केले.
नेहुली येथील रायगड जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित या समारंभाप्रसंगी शिवछत्रपती राज्य क्र ीडा पुरस्कार विजेत्या डॉ. नंदिनी बोंगाडे, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन संघटनेचे महासचिव सुरेश बोंगाडे, जिल्हा क्र ीडा अधिकारी महादेव कसगावडे, रायगड जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेचे सौगत दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
सूर्यवंशी म्हणाले, खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे. राज्यस्तरीय स्पर्धेमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार असल्याने निवड चाचणीमध्ये उत्तम कामगिरी करावी व निवडलेल्या संघांनी राष्ट्रीय स्पर्धेतही चांगली कामगिरी करून राज्यास जास्तीत जास्त पदके मिळवून द्यावी, अशा शब्दात त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहित केले. तसेच राज्यस्तर शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे दर्जेदार आयोजन केल्याबद्दल आयोजन समितीचे कौतुक केले.
या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्याच्या विविध आठ विभागांमधून ५७६ खेळाडू, क्र ीडा मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक सहभागी झाले होते. या स्पर्धेतील सर्व सहा गटांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांक संपादन केलेल्या संघातील खेळाडूंना चषक व पदके जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. नाशिक विभागाच्या १४ वर्षांखालील मुले संघाने प्रथम, १७ वर्षांखालील मुली व १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने तृतीय क्र मांक संपादन करून स्पर्धेत दुसऱ्या क्र मांकावर आपले स्थान ठेवले. यजमान मुंबई विभागास १४ वर्षांखालील मुलींच्या गटात तृतीय क्रमांक मिळाला.

Web Title: State Level Competition: Ball Badminton, Pune Division Domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.