मार्केटयार्ड घेणार राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 20:17 IST2018-08-27T20:14:41+5:302018-08-27T20:17:07+5:30
गेल्या काही वर्षांपासून श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ही स्पर्धा भरविण्यात येते.

मार्केटयार्ड घेणार राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पर्धा
पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री शारदा गजानन गणेशोत्सव राज्यस्तरीय ढोल-ताशा महाकरंडक स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. शारदा गजानन मंदिरासमोरील प्रांगणात ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान होणा-या स्पर्धेमध्ये शहरासह जिल्ह्यातील पथकांनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून मंडळाच्या वतीने ही स्पर्धा भरविण्यात येते. या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने झांजपथक, लेझीम पथकांनाही सहभागी होता येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन पायगुडे आणि कार्याध्यक्ष बाळासाहेब भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी, श्री शारदा गजानन मंदिराचे अध्यक्ष गणेश घुले, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, रोहन उरसळ, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र कोरपे आदी उपस्थित होते.
स्पर्धेतून तीन विजेते संघ निवडण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक पटकाविणाऱ्या ढोल-ताशा पथकास रोख १ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक व फिरता चषक, द्वितीय क्रमांकास रोख ७५ हजार रुपये, प्रशस्तीपत्रक, स्मृतीचिन्ह आणि तृतीय क्रमांकास रोख ५० हजार रुपये, प्रशस्तीपत्रक, स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. शहर तसेच जिल्ह्यातून सहभागी होणाºया संघांना वाहतुकीचा खर्च देण्यात येणार असल्याचेही पायगुडे यांनी नमूद केले़.