ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना राज्यस्तरीय ‘पठ्ठेबापूराव पुरस्कार’ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 04:06 PM2021-12-19T16:06:31+5:302021-12-19T16:06:38+5:30

पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘पठ्ठेबापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

state level paththebapurao award announced to senior tamasha artist raghuveer khedkar | ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना राज्यस्तरीय ‘पठ्ठेबापूराव पुरस्कार’ जाहीर

ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना राज्यस्तरीय ‘पठ्ठेबापूराव पुरस्कार’ जाहीर

googlenewsNext

पुणे : पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘पठ्ठेबापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.भास्करराव खांडगे पुरस्कार लावणी गायिका व नृत्यांगना पुष्पा सातारकर यांना व तमाशा साहित्यिक बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार गझलकार व शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांना देण्यात येणार आहे. अशी माहीती प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे यांनी दिली.
      
लोककला क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वास हे पुरस्कार दिले जातात. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष देविदास पाटील, कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे,महोत्सव समितीचे अध्यक्ष मित्रावरुण झांबरे यांनी दिली.

बुधवार दिनांक २२ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. पुरस्कार वितरण समारंभानिमित्त दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत ‘पुणे लावणी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. शाहीर अमर पुणेकर ,जय अंबिका कला केंद्र सणसवाडी, कविता बंड निर्मित ढोलकीचा खणखणाट घुंगरांचा छनछनाट, आर्यभूषण थिएटर पुणे येथील लोककलावंत आपली कला सादर करणार आहेत. महिलांसाठी बाल्कनी राखीव ठेवण्यात आलेली आहे. लोककलेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सर्वांना प्रवेश विनामूल्य उपलब्ध करून दिलेला आहे. 

Web Title: state level paththebapurao award announced to senior tamasha artist raghuveer khedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.