१८ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 03:55 PM2018-02-14T15:55:02+5:302018-02-14T15:55:27+5:30
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांतर्फे १८ फेब्रुवारी रोजी रामस्मृती लॉन्स, भोसरी - आळंदी रोड, भोसरी पुणे येथे ‘१२ वे राज्यस्तरीय अधिवेशन २०१८‘ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर अधिवेशन दोन सत्रात घेण्यात येणार असून या सत्रादरम्यान विविध कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
- हनुमंत देवकर
चाकण - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांतर्फे १८ फेब्रुवारी रोजी रामस्मृती लॉन्स, भोसरी - आळंदी रोड, भोसरी पुणे येथे ‘१२ वे राज्यस्तरीय अधिवेशन २०१८‘ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर अधिवेशन दोन सत्रात घेण्यात येणार असून या सत्रादरम्यान विविध कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे हस्ते होईल. स्वागताध्यक्ष म्हणून पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आहेत, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म. रा. मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने राहतील. प्रमुख अतिथी म्हणून दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, म. रा. मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंढे, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक प्रमुख मुंबईचे रणधिर कांबळे, वृत्तवाहिनी विभाग प्रमुख मनिष केत यांची उपस्थिती राहणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात सकाळी ११.३० वाजता ‘’माध्यमांचे बदलते स्वरुप’’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दैनिक लोकमत पुणेचे संपादक विजय बाविस्कर, दै. लोकमंथन समुहाचे अशोकराव सोनवणे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक तुळशिदास भोईटे, मिरर टाइम्स नाउु चे वरिष्ठ वृत्त संपादक मंदार फणसे, दैनिक जनशक्ती पुणेचे कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे
दुसरे सत्र दुपारी ३ ते ६ या कालावधीत पार पडेल. यावेळी ‘स्वातंत्र सैनिक स्व. जवाहरलाल दर्डा जीवनगौरव राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे’ आयोजन करण्यात आले असून दै. पुण्यनगरीचे समुह संस्थापक मुरलीधर (बाबा) शिंगाटे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी माजी खासदार लोकमत माध्यम समूहाचे चेअरमन विजबाबू दर्डा यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर भूषवणार आहेत. यावेळी दिंडोरीचे चंद्रकांतदादा मोरे, कृ. उ. बा.स. पुणे प्रशासक बी. जे. देशमुख यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी परिवहन राज्यमंत्री दिवाकर राते, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे म्हणून जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खा. अमर साबळे, खा. श्रीरंग बारणे, आ. गौतम चाबुकस्वार, दै. जनशक्तीचे संपादक कुंदन ढाके आदी उपस्थित राहणार आहेत.
सदर १२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाला तसेच आयोजित चर्चासत्र व कार्यक्रमाला बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म. रा. मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष सर्वश्री राजेंद्र वाघमारे, वृतवाहीनी संघाचे अध्यक्ष मनिष केत, सोमनाथ देशकर, कुंदन पाटील, राकेश टोळ्ये, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश संपर्क प्रमुख अॅड. हर्षल कुमार चिपळूणकर, नितीन शिंदे, मंत्रालय संपर्क प्रमुख खंडुराज गायकवाड, नितीन तोरसेकर, वृत्तवाहिनी संपर्क प्रमुख उमेश कुणकर्णी, प्रदेश सहचिटणीस सुरेखा खानोरे, विभाग प्रमुख व्यंकटेश दुधमवार, अमरावती विभागीय अध्यक्ष निलेश सोमाणी, हल्ला विरोधी समिती प्रमुख ईश्वरसिंग ठाकुर, कोकण विभागीय अध्यक्ष किरण बाथम, मुंबई अध्यक्ष संजय माळवदे, विदर्भ प्रमुख बाळासाहेब देशमुख, सांस्कृतीक विभागीय अध्यक्ष संदिप भटेवरा, नंदुरबार धुळे जळगाव विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, पश्चिम महाराष्ट्र सहचिटणीस सतिष सावंत, मराठवाडा सहसचिव बाळासाहेब लोणे, पुणे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे, पुणे शहर जिल्हाध्यक्ष किरण जोशी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके, शांताराम हिंगणे, उमेश ओव्हळ आदींसह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.