राज्य शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला; राज्यातून ९ लाख विद्यार्थी

By प्रशांत बिडवे | Published: February 12, 2024 03:31 PM2024-02-12T15:31:29+5:302024-02-12T15:31:51+5:30

पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व उच्च माध्यमिक या दाेन्ही शिष्यवृत्तीसाठी एकूण ८ लाख ९१ हजार ७०० विद्यार्थी परीक्षा देणार

State Scholarship Examination on February 18 9 lakh students from the state | राज्य शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला; राज्यातून ९ लाख विद्यार्थी

राज्य शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला; राज्यातून ९ लाख विद्यार्थी

पुणे : पूर्व उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचे येत्या रविवारी दि. १८ फेब्रुवारी राेजी आयाेजन करण्यात आले आहे. राज्यातील ६ हजार १८३ परीक्षा केंद्रांवर राज्यातील सुमारे १ लाख शाळांमधील पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व उच्च माध्यमिक या दाेन्ही शिष्यवृत्तीसाठी एकूण ८ लाख ९१ हजार ७०० विद्यार्थीपरीक्षा देणार आहेत.

राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांचा शाेध घेत त्यांना प्राेत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची याेजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने १९५४-५५ पासून सुरू केली आहे. उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचे १६ हजार ६८३ व माध्यमिक शिष्यवृत्तीचे १६ हजार २५८ संच मंजूर आहेत. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षाकरिता आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दाेन वर्षे शिष्यवृत्ती दिली जाते.

सद्यस्थितीत ए ते के या संचानुसार उच्च प्राथमिक शिष्यवृतीकरिता संचनिहाय किमान २५० ते कमाल एक हजार रूपये प्रतिवर्ष तसेच माध्यमिक शिष्यवृत्तीकरिता संचनिहाय किमान तीनशे ते दीड हजार प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात येत हाेती. त्यामध्ये २०२४ परीक्षेपासून पूर्व उच्च प्राथमिकसाठी प्रतिवर्ष ५ हजार तर पूर्व माध्यमिकसाठी साडेसात हजार एवढी वाढ करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते.

शिष्यवृत्ती परीक्षेचे नाव / इयत्ता / शाळांची संख्या / प्रविष्ट विद्यार्थी

१. पूर्व उच्च प्राथमिक / पाचवी / ७७ हजार ७४०/ ५ लाख १० हजार ३७८

२.पूर्व माध्यमिक / आठवी / २४ हजार ५०४ / ३ लाख ८१ हजार ३२२

Read in English

Web Title: State Scholarship Examination on February 18 9 lakh students from the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.