राज्यातील एसटीसेवा कोलमडणार
By admin | Published: April 25, 2016 02:27 AM2016-04-25T02:27:11+5:302016-04-25T02:27:11+5:30
ऐन सुट्टीच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करीत असताना येत्या २६ एप्रिल रोजी राज्यभरातील एसटी सेवा कोलमडणार आहे.
भोर : ऐन सुट्टीच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करीत असताना येत्या २६ एप्रिल रोजी राज्यभरातील एसटी सेवा कोलमडणार आहे. एसटी कामगारांची कराराची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी महामंडळाच्या आर्थिक स्थितीचे कारण पुढे करत एसटी महामंडळाने करारातील १२ कलमे वगळल्याने कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एसटी कामगार संघटनेच्या वतीने २६ एप्रिलला विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे.
एसटी कामगार संघटनेने १ एप्रिल १०१६ पासून नव्याने लागू होणाऱ्या वेतनवाढीच्या मागण्यांचा मसुदा एक जानेवारीला एसटी प्रशासनाला सादर केला होता. मात्र त्याबाबत प्रशासनाने संघटनेबरोबर वाटाघाटी केल्या नाहीत. एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचारी म्हणून घोषित करुन वेतनातील तफावत दूर करावी या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. मुंबई येथे जाऊन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडणार आहोत.
- मोहन जेधे, अध्यक्ष पुणे जिल्हा एसटी कामगार संघटना