‘बहुजनांच्या विकासामुळेच राज्य विकसित होईल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:14 AM2018-06-27T06:14:39+5:302018-06-27T06:14:45+5:30
मराठा समाजाबरोबरच सर्व बहुजन समाज विकासाकडे जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकसित होणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत
पुणे : मराठा समाजाबरोबरच सर्व बहुजन समाज विकासाकडे जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकसित होणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आरक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षण आणि रोजगाराच्या संधी सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील मुला-मुलींना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे सर्व समाजाचा बरोबरीने विकास होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केले.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) उद्घाटन बालचित्रवाणीच्या इमारतीत करण्यात आले. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सारथीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, जगाच्या इतिहासात कधीही निघाले नाहीत, असे लाखोंच्या संख्येने मराठा समाजाच्या वतीने शिस्तबद्ध मोर्चे काढण्यात आले. मोर्चे मूक असले तरी त्यांचा आवाज हजारोंच्या पटीने मोठा होता. सर्व मागण्या ऐकून सारथी संस्थेची निर्मिती करण्यात आली.या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य दिले जाणार आहे. र