राज्य महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयाचे आज पुण्यात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:11 AM2021-03-08T04:11:45+5:302021-03-08T04:11:45+5:30

पुणे : राज्य महिला आयोगाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन सोमवार (दि. ८) मार्च रोजी जागतिक महिलादिनी विभागीय उपआयुक्त, ...

State Women's Commission Divisional Office inaugurated in Pune today | राज्य महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयाचे आज पुण्यात उद्घाटन

राज्य महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयाचे आज पुण्यात उद्घाटन

googlenewsNext

पुणे : राज्य महिला आयोगाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन सोमवार (दि. ८) मार्च रोजी जागतिक महिलादिनी विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास विभाग, चर्च रोड, पुणे-३ येथे महिला व बाल विकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद यांच्या हस्ते होणार आहे.

पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्हयांमध्ये महिलांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण होण्याच्या दृष्टीने महिलांना त्यांच्या इच्छेनुसार तज्ज्ञ समुपदेशकांमार्फत समुपदेशन केले जाईल किंवा स्थानिक पोलीस स्टेशनकडून सहकार्य घेण्यात येईल. अतिमहत्त्वाच्या गंभीर स्वरुपाच्या तक्रारी किंवा स्वाधिकारे नोंद घ्यावयाच्या तक्रारींबाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येईल. आयोगाच्या विभागीय कार्यालयाद्वारे प्रस्तावित, नियोजित सुनावण्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येतील.

विभागातील विविध प्रकारच्या अत्याचाराने पीडित महिलांनी व अशा महिलांना मदत करु इच्छिणाऱ्यांनी दूरध्वनी क्रमांक ०२०-२६११२००४ अथवा ईमेल आयडी div.wcd.pune1@gmail.com किंवा समक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बाल विकास उपउपायुक्त दिलीप हिवराळे यांनी केले.

Web Title: State Women's Commission Divisional Office inaugurated in Pune today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.