जुन्नरमध्येही दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:58+5:302021-07-04T04:07:58+5:30
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष धनराज खोत, महिलाध्यक्ष आरती ढोबळे, नगरसेवक फिरोज पठाण, भाऊसाहेब कुंभार, नगरसेविका हाजरा इनामदार, ...
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष धनराज खोत, महिलाध्यक्ष आरती ढोबळे, नगरसेवक फिरोज पठाण, भाऊसाहेब कुंभार, नगरसेविका हाजरा इनामदार, कासम सय्यद, सचिन गिरी, अजीम इनामदार, सुरेखा वेठेकर, शोभा शिंदे, सुजाता डोंगरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
डिझेल व घरगुती गॅसच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने सर्वसामान्य माणसाचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढीमुळे पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तर डिझेलचे दरदेखील शंभर रुपयांच्या उंबरठ्यावर आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कोरोना महामारीमुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने बेरोजगारी वाढली आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांना वेठीस धरणारी व अन्यायकारक आहे. त्यामुळे ही दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
०३ जुन्नर एनसीपी
गॅस व इंधन दरवाढीचा निषेधार्थ निवेदन देताना धनराज खोत व इतर.