पाणी योजनेबाबत आमदार बेनकेंना दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:56+5:302021-07-01T04:08:56+5:30
या निवेदनात असे म्हटले आहे की, जुन्नर तालुक्यातील उत्तरेकडील दुष्काळी भागाला वरदान ठरलेली बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना माजी आमदार ...
या निवेदनात असे म्हटले आहे की, जुन्नर तालुक्यातील उत्तरेकडील दुष्काळी भागाला वरदान ठरलेली बेल्हे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या काळात मंजूर होऊन माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या काळात पूर्ण झाली. सुमारे २५ वर्षांपूर्वी झालेली योजना आता कालबाह्य झालेली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे यांनी ही योजना नव्याने आळे, उंब्रज नंबर २,खामुंडी, गायमुखवाडी, पिंपरी पेंढार,नवलेवाडी, पादीरवाडी,वडगाव आनंद, पिंपळवंडी,वाळुंज वाडी,आनंद मळा, आळेफाटा या गावांसाठी टप्पा क्रमांक १ अंदाजित शासकीय रक्कम ३२ लाख ८४ हजार अशी तयार केली आहे.तसेच बेल्हा, राजुरी,गुळंचवाडी,अणे,पेमदरा,नळवणे, शिंदेवाडी या गावांसाठी टप्पा क्रमांक २ अंदाजी शासकीय रक्कम ५३ लाख ५५ हजार अशी तयार केली आहे.सदर योजना आता तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आलेली आहे.तरी या योजनेस तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळणे बाबत आमदार अतुल बेनके यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी पवार यांनी केली आहे.