मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गृहमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:15 AM2021-08-24T04:15:12+5:302021-08-24T04:15:12+5:30

या वेळी मराठी क्रांती मोर्चाचे समन्वय मनोहर वाडेकर, भगवान मेदनकर, अशोक मांडेकर, राहुल नायकवाडी, अतिष मांजरे, विजय खरमाटे, बाबा ...

Statement to Home Minister on behalf of Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गृहमंत्र्यांना निवेदन

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गृहमंत्र्यांना निवेदन

googlenewsNext

या वेळी मराठी क्रांती मोर्चाचे समन्वय मनोहर वाडेकर, भगवान मेदनकर, अशोक मांडेकर, राहुल नायकवाडी, अतिष मांजरे, विजय खरमाटे, बाबा कौटकर, दिनेश शिंदे उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून देण्यास टाळाटाळ होत असल्याने आपल्या मागण्यांसाठी नांदेड येथे २० ऑगस्टला मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मूक मोर्चात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी झाले होते. या वेळी शासकीय अथवा खासगी मालमत्तेचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. मूक मोर्चा शांततेत पार पडला आहे. तरीही पोलिसांनी मूक मोर्चात सहभागी झालेल्या मराठा समाज बांधवांवर गुन्हे दाखल केले आहेत. ते मागे घ्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

२३ चाकण

मागणीचे निवेदन गृहमंत्र्यांना देताना मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी.

Web Title: Statement to Home Minister on behalf of Maratha Kranti Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.