नवीन पोलीस वसाहतीसाठी गृहमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:14 AM2020-12-05T04:14:59+5:302020-12-05T04:14:59+5:30

भोर-वेल्हा-मुळशी तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली असून सर्वञ दलदल आहे. झाडेझुडपे उगवलेली, मोकाट प्राण्यांचा वावर ...

Statement to Home Minister for new police colony | नवीन पोलीस वसाहतीसाठी गृहमंत्र्यांना निवेदन

नवीन पोलीस वसाहतीसाठी गृहमंत्र्यांना निवेदन

Next

भोर-वेल्हा-मुळशी तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली असून सर्वञ दलदल आहे. झाडेझुडपे उगवलेली, मोकाट प्राण्यांचा वावर अशा अत्यंत वाईट आवस्थेत पोलीस कर्मचारी व अधिकारी राहात आहेत. त्यासाठी.आमदार संग्राम थोपटे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुंबई मंत्रलाय येथे भेट घेऊन नवीन पोलीस वसाहतीबाबत निवेदन दिले. यावर देशमुख यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. वसाहत उभारणीसाठी ज्या ठिकाणी जागेची गरज आहे तेथे जागा उपलब्ध करण्यात येईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी मंजूर करण्यात येणार असून तीन्ही तालुक्यातील अनेक वर्ष प्रलंबीत असलेला पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लागणार आहे

दरम्यान मुळशी तालुक्यातील भुगाव, भुकुम, पिरंगुट, लवळे चांदे या सहा गावांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याच्या हालचाली सुरु आहे. मात्र, यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवल्याने आमदार थोपटे यांनी गृहमंत्री अनील देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर देशमुख यांनी या सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Statement to Home Minister for new police colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.