लखलखला शिवाजी महाराजांचा पुतळा
By admin | Published: November 15, 2015 01:07 AM2015-11-15T01:07:50+5:302015-11-15T01:07:50+5:30
शिवछत्रपतींचा जगातील पहिला भव्य अश्वारूढ पुतळा असणाऱ्या एसएसपीएमएम शाळेचा परिसर तुतारीच्या ललकारीत आणि सनई-चौघड्यांच्या मंगल निनादात प्रकाशाने उजळून निघाला
पुणे : शिवछत्रपतींचा जगातील पहिला भव्य अश्वारूढ पुतळा असणाऱ्या एसएसपीएमएम शाळेचा परिसर तुतारीच्या ललकारीत आणि सनई-चौघड्यांच्या मंगल निनादात प्रकाशाने उजळून निघाला. असंख्य पुणेकरांनी या पुतळ्याच्या वजनाइतक्याच ८ हजार पणत्या प्रज्वलित केल्या. शिवजयंती महोत्सव समितीतर्फे या उपक्रमाच्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते.
दीपोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट, बाळासाहेब लांडगे, नगरसेवक बाळासाहेब बोडके, अॅड. प्रताप परदेशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, प्रवीण परदेशी, शिल्पकार विवेक खटावकर, वामनतात्या जगताप, समितीचे संस्थापक-अध्यक्ष अमित गायकवाड व उपस्थित स्वराज्य घराण्यांच्या हस्ते झाले. अखंड भारताच्या स्वभिमानाचे प्रतीक असणारा शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन बापट यांचा सत्कार करण्यात आला.
समितीतर्फे शिवजयंतीला आयोजिण्यात येणाऱ्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी झालेल्या पासलकर, जेधे, बांदल, कंक, मालुसरे, पायगुडे, कोंढे, ढमढेरे, सणस, शिळीमकर, करंजावणे, निंवगुणे, कडू, धुमाळ, काकडे, मोहिते, घोरपडे, जगताप, थोपटे, मरळ, शितोळे, भुरुक, पवार, गायकवाड, शिंदे या स्वराज्य घराण्यांचा सत्कार करण्यात आला. दीपोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी गेले ४ पर्व काम करणाऱ्या नीलेश जगताप, शिवाजी तावडे, युवराज शिंदे, सुशांत साबळे, कृष्णसुंदर गार्डनचे कर्मचारी यांनाही गौरविण्यात आले.
समितीच्या गिरीश गायकवाड, दीपक घुले, रणजित शिंदे, महेश मालुसरे, सचिन पायगुडे, नीलेश जेधे, शंकर कडू, गोपी पवार, दत्ताभाऊ पासलकर, किरण देसाई, किरण कंक, मयूरेश दळवी, प्रशांत साळुंखे, धीरज थोपटे, बाळासाहेब माने, रवींद्र कंक, रोहित घोरपडे, प्रशांत धुमाळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले.