ऐन शिवजयंतीच्या दिवशी कोथरुडमधील महाराजांचा पुतळा विना सजावट; काँग्रेस व राष्ट्रवादी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:59 PM2019-02-19T12:59:16+5:302019-02-19T13:01:05+5:30
सर्वत्र शिवजयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे. मात्र, कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला कुठलीही सजावट केली गेलेली नाही.
पुणे: संपूर्ण देशभरात शिवजयंती जल्लोषात साजरी होत असताना मात्र, कोथरूडमध्येछत्रपती शिवाजी महाराज पुतळ््याला कोेणत्याही प्रकारची सजावट करण्यात आली नाही. हा एकप्रकारे महाराजांचा अपमान आहे. आणि तो आम्ही कदापि सहन करणार नाही अशी भूमिका घेत काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महापालिकेच्या या कृतीविरोधात आंदोेलन छेडले. त्यामुळे काही काळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच आंदोलकांकडून यावेळी महापौरांना लक्ष्य देखील करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वत्र शिवजयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे. मात्र, कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला कुठलीही सजावट केली गेलेली नाही. महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षातर्फे निषेध करत आंदोलन करण्यात आले. त्यावेळी महापौैर मुक्ता टिळक विरोधकांच्या टीकेला प्रत्त्युत्त्तर देताना म्हणाल्या, न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेच्या कररुपी पैशांची उधळपट्टी थांबविण्यात आली आहे. निधी उपलब्ध नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.