मावळातील स्थिती : जमिनीचे भाव वाढल्याने नाती दुरावली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 01:26 AM2018-08-26T01:26:09+5:302018-08-26T01:26:35+5:30

मावळातील स्थिती : रक्षाबंधनला बहिणी भावाच्या प्रेमाला पारख्या

Status of moorings: Due to increase in land prices, discontinuance | मावळातील स्थिती : जमिनीचे भाव वाढल्याने नाती दुरावली

मावळातील स्थिती : जमिनीचे भाव वाढल्याने नाती दुरावली

Next

वडगाव मावळ : मावळात जमिनीला सोन्याचे भाव आल्याने राखी पौर्णिमेच्या पवित्र सणाला भाऊ-बहिणीत दुरावा निर्माण झाला आहे. वडिलांकडून मिळणा-या वारसा हक्काच्या जमिनीवर बहिणी दावा करू लागल्याने त्यांना भावाच्या प्रेमाला पारखे व्हावे लागत आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाभोवती मावळ तालुक्याचा विस्तार आहे. त्यामुळे मावळातील जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. बहिणाला जमिनीचा व संपत्तीचा हिस्सा नाकारणाऱ्या काही भावांमुळे या रक्षाबंधनाच्या पवित्र सणात नात्यामध्ये दुरावा आल्याचे दिसू लागले आहे.

राखी पौर्णिमेच्या सणाला भाऊ-बहिणीला तिच्या सासरी जाऊन बहिणीकडून ओवाळून घेतो. आपल्या अर्थिक क्षमतेनुसार भाऊ तिला प्रेमाचे प्रतीक म्हणून साडी, मुलांना कपडे, भेटवस्तू देतो. असे चित्र पूर्वीपासून दिसत आहे. परंतु अलीकडे काही वर्षांपासून काही भावांनी या पवित्र सणाला बहिणींकडे जाण्याचे टाळण्याचा प्रकार सुरू झाला आहे. वारसा हक्क सोडण्यासाठी दबाव शहर असो किंवा ग्रामीण भाग असो या ठिकाणी जमिनीला सोन्यापेक्षा अधिक भाव मिळत आहे. जिकडे तिकडे बांधकामे जोमात सुरू आहेत. काही जमीन मालकांनी स्वत:च्या जमिनी बांधकाम व्यावसायिकांना विकणे, अथवा ४० ते ६० टक्क्यांनी त्यांच्याशी भागीदारीत सदनिका, बंगले, रो-हाऊस बांधणे याकडे कल वाढला आहे. या जमिनींच्या व्यवहारासाठी वारस हक्काने बहिणीचे नाव लागल्याने तिच्या सहीला किंवा अंगठ्याला फार महत्त्व आले आहे. बहिणीला हिश्श्याचे पैसे न देण्यासाठी काही भावांनी बहिणीचा तसेच तिच्या पतीला दमदाटी करून वारसा हक्काने उताºयावरील नावे कमी करण्यासाठी प्रयत्नही केला आहे.

किमती वस्तूंची भेट
गेल्या काही वर्षांपासून राखी पौर्णिमा सणाचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी खेड्यापाड्यात जायला वाहनांची सोय नव्हती. बहिणीकडे जाण्यासाठी बैलगाडीतून किंवा पायी जात असत. आता दुचाकी व चारचाकी वाहनांची सोय झाली आहे. जमिनींचे व्यवहार झालेल्या काही कुटुंबात बहिणीला कायदेशीररित्या तिचा समान हिस्सा असल्याने तसेच जमिनीची विक्री करताना काहीही न मागता सही केली. अशा समजूतदार बहिणींना भावांकडून आनंदाने राखी पौर्णिमेच्यानिमित्ताने किमती साडीसह, सोन्याचे दागिने, चारचाकी किंवा दुचाकी वाहने दिल्याची उदाहरणे आहेत.
 

Web Title: Status of moorings: Due to increase in land prices, discontinuance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.