SPPU | पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशनला पुन्हा 'लिडर्स' चा दर्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 12:11 PM2022-04-05T12:11:52+5:302022-04-05T12:16:05+5:30

रिसर्च पार्क फाऊंडेशन ही सेक्शन ८ अंतर्गत येणारी कंपनी आहे..

status of leaders again to the research park foundation of savitribai phule pune university | SPPU | पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशनला पुन्हा 'लिडर्स' चा दर्जा

SPPU | पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशनला पुन्हा 'लिडर्स' चा दर्जा

Next

पुणे : महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन' ला (sppu research park foundation) 'लिडर्स' चा दर्जा मिळाला असून पाच कोटी रुपयांचा सीड फंड देखील मिळाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (Savitribai Phule Pune University) रिसर्च पार्क फाऊंडेशन ही सेक्शन ८ अंतर्गत येणारी कंपनी आहे.

मागील वर्षी विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाला हा 'लिडर्स'चा दर्जा देण्यात आला होता. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील १७ नवोपक्रम केंद्रांमध्ये फाऊंडेशनला हा दर्जा मिळाला आहे तर सोलापूर विद्यापीठाच्या 'उद्यम' आणि अकोल्यातील 'पीडीकेव्ही' या केंद्रांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. ही दोनही केंद्र सुरूवातीच्या टप्प्यामधे गणली जातात.

रिसर्च पार्क फाउंडेशनच्या माध्यमातून २०१९ मध्ये ११, २०२० मध्ये २७ तर  २०२१ मध्ये ५० स्टार्टअपवर काम सुरू असल्याचे विद्यापीठातील इनोव्हेशन सेलच्या प्रमुख डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले.

डॉ. पालकर म्हणाल्या, फाऊंडेशनच्या माध्यमातून २०० पेक्षा अधिक नोकऱ्या निर्माण करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाशी संबंधित काही प्रमुख स्टार्टअपमध्ये प्रॉप स्पेसमधील कोग्निलिमेंट, ऍग्री टेकमधील इनोव्हेशन, हेल्थटेक मध्ये दिपटेक, सोशल इनोव्हेशनमध्ये सोशल इंडेक्स चा समावेश आहे.

विद्यापीठ आय टू ई, पिच फेस्टबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अनेक स्टार्टअप विषयक स्पर्धा दरवर्षी घेते. त्यातून अनेक सामाजिक प्रश्नांवर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असल्याचेही पालकर यांनी सांगितले.

तीन वर्षांच्या अल्प कालावधीत विद्यापीठाने केलेल्या कामाची ही पावती आहे, असे मी समजते. महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीने अकोला आणि सोलापूर येथील नवोपक्रम केंद्राचे मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची निवड केली याचा नक्कीच आनंद आहे. 
- डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका
नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र

Web Title: status of leaders again to the research park foundation of savitribai phule pune university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.