समाजातील ज्येष्ठांचे स्थान अढळ
By admin | Published: January 1, 2015 11:41 PM2015-01-01T23:41:53+5:302015-01-01T23:41:53+5:30
समाजजीवनामध्ये ज्येष्ठांचे स्थान अढळ आहे. आज वैज्ञानिक, वैद्यकीय, आर्थिक समृद्धीमुळे माणसांची वयोमर्यादा वाढलेली आहे.
बारामती : समाजजीवनामध्ये ज्येष्ठांचे स्थान अढळ आहे. आज वैज्ञानिक, वैद्यकीय, आर्थिक समृद्धीमुळे माणसांची वयोमर्यादा वाढलेली आहे. प्रत्येक ठिकाणी, क्षेत्रांमध्ये ज्येष्ठांचा सहभाग वाखाणण्यासारखा असतो. प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रसंगामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह दिसून येतो. कुटुंबामध्ये आजी-आजोबांचे स्थान हे खो-खोच्या खांबासारखे आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी होते. कार्यक्र मात स्व. खुशालभाऊ छाजेड यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘बारामती गौरव’ पुरस्कार स्वातंत्र्यसैनिक भाई रणसिंग यांना देण्यात आला. स्व. गीताबाई खुशालचंद छाजेड यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘आदर्श माता पुरस्कार’ प्रमिला हरिभाऊ देशपांडे यांना देण्यात आला. कै. रघुनाथ बोरावके यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘जनसेवा पुरस्कार’ दिपेश अँड रूपेश स्मृती ट्रस्ट या संस्थेस देण्यात आला. स्व. सोनुबाई धनराज भंडारी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘भक्त पुंडलिक पुरस्कार’ राजन बाळसाहेब कलंत्रे यांना देण्यात आला. निरपेक्ष कार्यकर्ता पुरस्कार वसुधा वाघ यांना प्रदान करण्यात आला. संघाचे अध्यक्ष माधव जोशी यांनी प्रास्ताविक केले. गणेश देव यांनी सूत्रसंचालन के ले. विजय वजरिनकर यांनी आभार मानले.