"रिलेशनशिपमध्ये राहा, नाहीतर बहिणीला मारेल" धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By भाग्यश्री गिलडा | Updated: November 17, 2023 16:41 IST2023-11-17T16:40:39+5:302023-11-17T16:41:40+5:30
१५ वर्षीय मुलीचे अश्लील फोटो तिच्या आईला आणि आजीला पाठवल्याने मुलीच्या आईने तक्रार नोंदवली आहे....

"रिलेशनशिपमध्ये राहा, नाहीतर बहिणीला मारेल" धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पुणे : एका गेमिंग अप्लिकेशनवरून मैत्री करून अल्पवयीन मुलीला अश्लील फोटो पाठवण्यास भाग पडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने मार्केटवयार्ड पोलिसांना तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जून २०२३ ते जुलै २०२३ दरम्यान घडला आहे. १५ वर्षीय मुलीचे अश्लील फोटो तिच्या आईला आणि आजीला पाठवल्याने मुलीच्या आईने तक्रार नोंदवली आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार, एका गेमिंग अप्लिकेशनवरून अल्पवयीन मुलीची आरोपी अमनकुमार या मुलासोबत ३ वर्षांपूर्वी मैत्री झाली होती. "आपण ३ वर्षांपासून रिलेशनमध्ये आहोत आता तू मला न्यूड फोटो पाठव" असे सांगून पीडितेकडून फोटो मागवून घेतले. त्यानंतर पीडितेने संपर्कात राहण्यास नकार दिल्याने तुझ्या बहिणीला जीवे ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. पीडितेने पुन्हा संपर्क न केल्याने तिचे अश्लील फोटो आई आणि आजीच्या व्हाट्सअपवर पाठवले. याप्रकरणी अमनकुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत.