‘मिशन’ पूर्ण होईपर्यंत मुक्काम पोस्ट ‘पुणे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:09 AM2020-12-27T04:09:00+5:302020-12-27T04:09:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘मी कोल्हापुरला परत जाणार,’ या वाक्यावरुन उलटसुलट चर्चा झाली. केंद्राने माझ्यावर सोपवलेले ‘मिशन’ जोपर्यंत ...

Stay post ‘Pune’ till ‘Mission’ is completed | ‘मिशन’ पूर्ण होईपर्यंत मुक्काम पोस्ट ‘पुणे’च

‘मिशन’ पूर्ण होईपर्यंत मुक्काम पोस्ट ‘पुणे’च

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘मी कोल्हापुरला परत जाणार,’ या वाक्यावरुन उलटसुलट चर्चा झाली. केंद्राने माझ्यावर सोपवलेले ‘मिशन’ जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी पुण्यातच असणार आहे, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरला परतण्याच्या वक्तव्यावरुन घुमजाव केले.

“माझ्या परत जाण्याच्या वक्तव्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये अगर घाबरून जाऊ नये. या वाक्याचे असे पडसाद उमटतील याची कल्पना नव्हती,” असे पाटील यांनी शनिवारी (दि. २६) पत्रकार परिषदेत सांगतिले. निवृत्तीनंतर मी पुन्हा आपल्या गावी (कोल्हापुर) जाण्याविषयीचा तो उल्लेख होता, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणूक कोथरुडमधूनच लढणार का, या बद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही, असेही पाटील म्हणाले. त्यांनी सांगितले की, शुक्रवराच्या कार्यक्रमात खासदार गिरीश बापट यांनी माशेलकरांना उद्देशून पुणे ‘सेटल’ होण्यासाठी उत्तम शहर असल्याचे म्हटले होते. त्याचा संदर्भ घेत मी, ‘पुणे उत्तमच आहे; पण मी कोल्हापुरलाच जाईन,’ असे म्हणालो होतो.

चौकट

अजित पवारांना प्रत्युत्तर

“अजित पवार यांनी आपल्या पक्षाची तसेच पक्षातील स्वत:च्या स्थानाची काळजी करावी. राज्यात मोठी जबाबदारी द्यायची वेळ आलीच तर शरद पवार कोणाला देतील हे सुद्धा एकदा विचारुन घ्यावे. ८० तासांच्या सरकारसाठी जे २८ सोबत आणले होते त्यांना ते सोबत ठेवू शकले नाहीत मग इतरांना फोडण्याची काय भाषा करता?,” असे जोरदार प्रत्त्युतर चंद्रकांत पाटील यांनी दिले. आमदार सतेज पाटील आणि अजित पवार यांच्या टिकेकडे लक्ष देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

पाटील म्हणाले...

-कोल्हापुरात महाविकास आघाडीचे तीन पक्ष वेगवेगळे लढत असल्याचे नाटक आहे. निवडणूकपुर्व भांडण नको म्हणून ही तडजोड आहे. दोन दिवस आधी निवडून येणाऱ्या उमेदवाराला सर्व मदत करतील आणि निवडणूकपश्चात युती होईल.

-मराठा आरक्षणाबाबत केंद्राचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली असून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडायची की नाही, घटनेत बदल झाल्यावर राज्याला अधिकार उरतो का याविषयी नोटीसीत उत्तर मागितले आहे. त्यावर खडे फोडण्याची आवश्यकता नाही.

-एकनाथ खडसेंना खरेच ईडीची नोटीस मिळाली का हे माहिती नाही. ईडी लावली तर सीडी लावतो म्हणणाऱ्यांना ‘सीडी’ लावण्यास कोणी अडविले आहे?

Web Title: Stay post ‘Pune’ till ‘Mission’ is completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.