वर्क फ्रॉम होम करतानाही राहा ट्रेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:15 AM2021-08-17T04:15:33+5:302021-08-17T04:15:33+5:30

कपडे हे आपल्या व्यक्तिमत्वाला उठावदार आणि आकर्षक करत असतात. आपल्या पेहरावावरच आपली छाप ही समोरील व्यक्तीवर पडत असते. त्यामुळे ...

Stay trendy while working from home | वर्क फ्रॉम होम करतानाही राहा ट्रेंडी

वर्क फ्रॉम होम करतानाही राहा ट्रेंडी

Next

कपडे हे आपल्या व्यक्तिमत्वाला उठावदार आणि आकर्षक करत असतात. आपल्या पेहरावावरच आपली छाप ही समोरील व्यक्तीवर पडत असते. त्यामुळे घरी असतो तरी प्रेझेन्टेबल राहिल्यास याचा फायदा करिअरसाठी होऊ शकतो. आयटी सेक्टरमध्ये येत्या काळात वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्यात येणार आहे. वर्क फ्रॉम होमसाठी टीमवर्क, झूम यासारख्या ऑनलाईन सॉप्टवेअरचा वापर होत आहे. यात लॅपटॉपच्या पुढील कॅमेऱ्याच्या साह्याने किंवा वेबकॅमच्या साह्याने प्रत्यक्ष काम केले जाते. घरातच असल्याने अनेकजन घरगुती कपड्यांमध्येच या बैठकांना उपस्थिती लावतात. मात्र, वर्क फ्रॉम होममुळे गेल्या दीड वर्षापासून घरगुती कपड्यांमध्येच काम करतात. यामुळे ऑफिससाठी हाैशेने घेतलेले कपडे हे दोन वर्षांपासून कपाटातच घडी करून ठेवले आहे. घर बसल्या काम करायचे असले, तरी याचेही मूल्यमापन ऑफिसतर्फे केले जाते. यामुळे घरात असतानाही नीटनेटके आणि प्रेझेन्टेबल राहावे लागते. यामुळे घरी असतानाही चांगले कपडे असायलाच हवे. यासाठी घराच्या रंगसंगतीला शोभतील असे कपडे निवडावे. कॅमेऱ्यात भडक रंग अंगावर येतात. त्यामुळे घरी असताना हे कपडे टाळावे. लिंबू कलर, आकाशी रंगाचे कपडे कॅमेऱ्यात उठून दिसतात. त्यामुळे या रंगांना पसंती द्यावी. टेरीकॉटच्या कपड्यांएवजी कॉटनच्या कपड्यांना प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे सिल्क आणि लिननच्या कपड्यांऐवजी कॉटन आणि होजिअरीच्या कपड्यांना प्राधान्य द्यावे. जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्स असते तेव्हा टापटीप राहणे गरजेचे असते. तेव्हा आपल्या शरीराच्या वरील भाग हा उठावदार दिसणे गरजेचे असते. त्यामुळे देहबोलीला साजेसे दिसतील अशा कपड्यांना प्राधान्य द्यावे. इतर वेळीही स्वच्छ आणि प्रेस केलेले कपडे परिधान करावेत. महिलांहीनी भडक कपडे कॅमेऱ्यासमोर टाळावे. साध्या रंगातील टॉप, कुर्ती घालण्यास प्राधान्य द्यावे. भडक मेकअपऐवजी साधा मेकअप केल्यास आपण प्रेझेंटेबल दिसतो. त्यामुळे या प्रकारच्या पेहरावाला प्राधान्य द्यावे. अशा पद्धतीच्या राहणीमानामुळे वर्क फ्रॉम होममध्येही ट्रेन्डी राहता येईल.

-निनाद देशमुख

Web Title: Stay trendy while working from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.