दुबईत राहताय... रेशनकार्ड मिळेल

By Admin | Published: February 21, 2015 01:50 AM2015-02-21T01:50:42+5:302015-02-21T01:50:42+5:30

परदेशात जन्म झालेल्या व्यक्तीला रेशनकार्डसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ते विभागीय आयुक्त कार्यालय आणि गृह विभागाची परवानगी लागते.

Staying in Dubai ... get a ration card | दुबईत राहताय... रेशनकार्ड मिळेल

दुबईत राहताय... रेशनकार्ड मिळेल

googlenewsNext

पुणे : परदेशात जन्म झालेल्या व्यक्तीला रेशनकार्डसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ते विभागीय आयुक्त कार्यालय आणि गृह विभागाची परवानगी लागते. मात्र, तुमचा जन्म दुबईत झाला असला तरी अडचण नाही, फक्त काही कागदपत्रे द्या, रेशनकार्ड देतो, असे पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका नायब तहसीलदारालाच एजंटने सांगितले.
शिवाजीनगर गोदामात असलेल्या नागरी सुविधा केंद्राला पडलेला एजंटांचा विळखा ‘लोकमत’ने शुक्रवारी ‘स्टिंग आॅपरेशन’द्वारे उघडकीस आणला. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने एका नायब तहसीलदार दर्जाच्या महिला अधिकाऱ्यास पाहणी करण्यासाठी पाठविले. त्यांनी नागरी सुविधा केंद्राच्या आवारात प्रवेश केला. वेळ संपली असल्याने कार्यालय बंद होते. त्यामुळे चौकशी करत असताना एका एजंटने बरोबर हेरले. स्वत:हून चौकशी सुरू केली. या नायब तहसीलदार यांनी सांगितले, की माझा जन्म दुबईचा आहे, काही अडचण येईल काय? यावर एजंटकडून काही अडचण येणार नाही, असा विश्वास देण्यात आला. फक्त तुमच्या वडिलांचे लाईट बिल आणि तुमचा पासपोर्ट लागेल असे सांगण्यात आले. यावरदेखील तत्काळ दाखला पाहिजे असल्याने नक्की काही अडचण येणार नाही ना? असे विचारल्यावर, कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगितले. सोमवारी तुमचे काम होईल, असेही सांगण्यात आले.
हा सर्व प्रकार पाहून या नायब तहसीलदार चक्रावून गेल्या. त्यांनी तहसीलदार मोहिनी चव्हाण यांना याबाबतची सर्व माहिती दिली. त्यांनाही हा सर्व प्रकार पाहून धक्का बसला. याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

४कार्यालयाची वेळ संपल्यानंतरही एजंट नागरिकांकडून घेत होते कागदपत्रे.
४तत्काळसाठीही कोणती अडचण येणार नसल्याचा देतात विश्वास.
४कारवाईचे अधिकाऱ्यांचे आश्वासन.

शिवाजीनगर येथील नागरी सुविधा केंद्रात नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकारी महिलेलाच रेशनकार्ड काढण्याच्या प्रक्रियेची माहिती देताना एजंट.

Web Title: Staying in Dubai ... get a ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.