नदीच्या पुलावरच एसटीचा बसथांबा!

By admin | Published: November 15, 2015 12:40 AM2015-11-15T00:40:52+5:302015-11-15T00:40:52+5:30

पेठ गावातील बसस्टॉपवर अनेक खाजगी वाहने आडवी-तिडवी असतात. दुचाकी वाहनेसुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसला अडचण ठरत असल्याचे कारण चालक सांगून प्रवाशांना

STB bus stand on river bridge! | नदीच्या पुलावरच एसटीचा बसथांबा!

नदीच्या पुलावरच एसटीचा बसथांबा!

Next

पेठ : पेठ गावातील बसस्टॉपवर अनेक खाजगी वाहने आडवी-तिडवी असतात. दुचाकी वाहनेसुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसला अडचण ठरत असल्याचे कारण चालक सांगून प्रवाशांना बाह्यवळणावर वेळ नदीला पुलावर एसटी बस थांबवून प्रवाशांना तेथेच उतरवितात.
सातगाव पठार भागातील पेठ हा एकच बसस्टॉप आहे. वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, कॉलेजला जाणाऱ्या व पेठ येथे कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामुळे मानसिक त्रास होतो. खात्याच्या अधिकाऱ्यांनी बाहेरून जाणाऱ्या एसटीबसचे सर्वेक्षण करावे व पेठ गावातून येणाच्या सूचना चालकांना द्याव्यात, अशी मागणी संतोष धुमाळ, सचिन पानसरे यांनी केली आहे. पेठ येथील एन. डी. पवळे कनिष्ठ महाविद्यालयात राजगुरुनगर व मंचर परिसरातील मुलेमुली शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना लोकल एसटी बसेस बाह्यवळण रस्त्यावर वेळ नदीच्या पुलावर सोडतात.एसटी बस पेठ गावातून न जाता बाह्यवळण मार्गाने परस्पर जात आहेत. त्यामुळे सातगाव पठार भागातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून परिवहन खात्याने बाहेरून जाणाऱ्या एसटी बस गाड्यांना गावातून जाण्याच्या सूचना देऊन प्रवाशांची गैरसोय टाळावी, अशी मागणी पेठचे उपसरपंच संतोष धुमाळ यांनी केली आहे.
सातगाव पठार भागातील कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पारगाव तर्फे खेड येथील प्रवाशी पेठ येथील एसटी स्थानकावर राजगुरुनगर,मंचर आदी ठिकाणी जाण्यासाठी गर्दी करतात. सध्या दिवाळी सण चालू असल्याने शेकडो प्रवासी पेठ येथे स्थानकावर तासन् तास उभे राहतात. पुण्याहून मंचरकडे व मंचरहून पुण्याला जाणाऱ्या साध्या व लोकल प्रवासी बस पुणे-नाशिक महामार्गाहून पेठ बायपासने परस्पर निघून जातात. स्टॉपवर थांबणे एसटी गाड्यांना बंधनकारक केले असताना जुन्नर, आंबेगाव तालुक्यातून पुणे, राजगुरुनगरकडे जाणाऱ्या काही एसटी बस पेठ गावातून येत नाहीत.

Web Title: STB bus stand on river bridge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.