दुसऱ्या मुलीनंतरही उचलले संततिनियमनाचे पाऊल
By admin | Published: March 9, 2016 12:50 AM2016-03-09T00:50:37+5:302016-03-09T00:50:37+5:30
‘एक वेळ मुलगा आईबापाला विचारणार नाही; पण मुली मात्र जीव लावतात, माया असते ती पोरींनाच, पोरांना नाय. म्हणूनच आम्ही निर्णय घेतला संततिनियमनाचा
घोडेगाव : ‘एक वेळ मुलगा आईबापाला विचारणार नाही; पण मुली मात्र जीव लावतात, माया असते ती पोरींनाच, पोरांना नाय. म्हणूनच आम्ही निर्णय घेतला संततिनियमनाचा...’ हे शब्द आहेत, वैशाली भालेराव यांचे. जागतिक महिला दिनीच मुलीचा जन्म झाल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करून संततिनियमन करून भालेराव दाम्पत्याने एक आदर्श उभा केला आहे. घोडेगाव ग्रामीण रूग्णालयामध्ये जागतिक महिला दिनाच्या दिवशीच महाळुंगे पडवळ येथील वैशाली भालेराव यांना दुसरी मुलगी झाली. या दाम्पत्याने संततिनियमन करण्याचा निर्णय डॉक्टरांना सिझर होण्यापूर्वीच सांगितला होता. मुलगी जन्माला आल्यानंतर कुठलीही तक्रार न करता या दाम्पत्याने डॉक्टरांना आॅपरेशन करण्यास सांगितले व संततिनियमनासाठी एक विधायक पाऊल उचलले. वैशाली भालेराव व पूजा काळे या दोन महिलांचा सत्कार केला. यावेळी श्रीकांत गाढवे, गणेश कोकणे, दत्तात्रय झुंजूरके, गणेश भास्कर, इत्यादी उपस्थित होते.