डासमुक्ती संकल्पावर उचलले पाऊल
By admin | Published: March 12, 2016 01:17 AM2016-03-12T01:17:28+5:302016-03-12T01:17:28+5:30
पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या डासमुक्ती संकल्पावर निरगुडसर ग्रामपंचायतीने पहिले पाऊल उचलले आहे. ‘डासमुक्ती नांदेड पॅटर्न’ योजनेचा शुभारंभ येथे शरद बँकेचे संचालक
निरगुडसर : पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या डासमुक्ती संकल्पावर निरगुडसर ग्रामपंचायतीने पहिले पाऊल उचलले आहे. ‘डासमुक्ती नांदेड पॅटर्न’ योजनेचा शुभारंभ येथे शरद बँकेचे संचालक विवेक वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मेंगडेवाडीचे सरपंच भरतफल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे नांदेड पॅटर्न राबविणारे निरगुडसर हे तालुक्यातील व जिल्ह्यातील पहिलेच गाव ठरणार आहे.
नवीन वर्षात जिल्हा परिषद प्रशासनाने डासमुक्ती संकल्पावर कामकाज सुरू केले आहे. मार्च अखेरपर्यंत डासमुक्ती करण्याचे नियोजन केले आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम गावपातळीवर राबविण्याचे ठरविले आहे. या वेळी सरपंच श्रद्धा जाधव, उपसरपंच रामदास वळसे पाटील, विघ्नहरचे संचालक
नामदेव थोरात, सुरेश टाव्हरे, बाळासाहेब मेंगडे, आनंदराव वळसे, माऊली टाव्हरे,
सुरेश आवारी, ग्रामविस्तार अधिकारी ए. एस. कांबळे उपस्थित होते. तसेच मेंगडेवाडी, जवळे, भराडी, पारगाव, खडकी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविस्तार अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
>> साधारणपणे खेडेगावात ताप या आजाराला लोक बळी पडत आहेत. मलेरिया, डेंगी, चिकुनगुण्या, हिवताप आदी आजारांचे प्रमाण वाढले आहे. हे आजार डास किंवा माशा खाद्यपदार्थांवर बसल्याने किंवा डंखकेल्याने होतात. मग डास किंवा माशा हद्दपार केले, तर आजारापासून मुक्तता मिळेल. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी ही योजना प्रभावीपणे राबवावी.
- स्मिता पाटील,
गटविकास अधिकारी आंबेगाव