२१ हजार रिक्षांचे, सरकारी कार्यालयांचे निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:34+5:302021-04-21T04:11:34+5:30

पुणे : सामाजिक कार्य म्हणून सुरू केलेल्या रिक्षा सॅनिटायझेशन उपक्रमात आप रिक्षा संघटनेने शहरातील २१ हजारांपेक्षा जास्त रिक्षांचे निर्जंतुकीकरण ...

Sterilization of 21,000 rickshaws, government offices | २१ हजार रिक्षांचे, सरकारी कार्यालयांचे निर्जंतुकीकरण

२१ हजार रिक्षांचे, सरकारी कार्यालयांचे निर्जंतुकीकरण

Next

पुणे : सामाजिक कार्य म्हणून सुरू केलेल्या रिक्षा सॅनिटायझेशन उपक्रमात आप रिक्षा संघटनेने शहरातील २१ हजारांपेक्षा जास्त रिक्षांचे निर्जंतुकीकरण केले. त्याशिवाय अनेक सरकारी कार्यालये, पोलीस चौक्यांमध्येही हा उपक्रम राबविण्यात आला.

यासाठी कोणतीही सरकारी मदत घेतलेली नाही हे विशेष! संघटना पूर्ण स्वखर्चाने हे काम करत आहे. त्यासाठी ५ रिक्षा तयार केल्या आहेत. त्यावर कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने काम करतात. सॅनिटायझर खरेदी थेट उत्पादकांकडून करण्यात येते.

याशिवाय संघटनेच्याच माध्यमातून १५०० रिक्षाचालकांचे लसीकरणही महापालिकेच्या साह्याने केले. संघटनेचे पदाधिकारी असगर बेग, गणेश ढमाले, आसिफ मोमीन, अशोक शिंदे, आनंद अंकुश, केदार ढमाले, उमेश बागडे, किरण कांबळे, सुनील फतपुरे, अनिल बगाडे, अनिल धुमाळ, मनोज फुलावरे, देवा इंगुळकर, विकास अंकुश, शेखर ढगे, चाँद शेख, मोईन चौधरी हे काम करत आहे. कोरोना संसर्ग पुणे शहरात बंद होत नाही तोपर्यंत हे काम सुरूच ठेवण्याचा संघटनेचा निर्धार आहे.

Web Title: Sterilization of 21,000 rickshaws, government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.