दोन महिन्यात ३०० मांजरींची नसबंदी; पुणे महापालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 10:32 AM2022-11-22T10:32:11+5:302022-11-22T10:35:01+5:30
पुणे महापालिकेने भटक्या माजरींचीही नसबंदी सुरू केली आहे...
पुणे : नसबंदी करूनही शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात आता पुणे महापालिकेने भटक्या माजरींचीही नसबंदी सुरू केली आहे. त्याची सुरूवात पुणे महापालिका भवनातील मांजरीपासून झाली. गेल्या दोन महिन्यात तीनशे मांजरींची नसबंदी केली आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी महापालिकेकडून त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण केले जाते. शस्त्रक्रियेनंतर कुत्र्यांना पकडलेल्या ठिकाणी पुन्हा सोडले जाते. त्याच धर्तीवर आता शहरातील भटक्या मांजरींनाही पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया व त्यांचे लसीकरण केले जाणार आहे.
पुणे महापालिकेने भटक्या माजरींचीही नसबंदी सुरू केली आहे. त्याची सुरूवात पुणे महापालिका भवनातील चार मांजरींपासून केली आहे. गेल्या दोन महिन्यात तीनशे मांजरींची नसबंदी करण्यात आली आहे.