पुण्यातल्या फक्त २० पुरुषांची नसबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:10 AM2021-02-10T04:10:51+5:302021-02-10T04:10:51+5:30

पुणे : शारीरिक क्षमतांवर विपरीत परिणाम होतो, शस्त्रक्रियेचे ‘साइड इफेक्ट’ मोठे आहेत अशा एक ना अनेक गैरसमजातून, पुरुष नसबंदी ...

Sterilization of only 20 men in Pune | पुण्यातल्या फक्त २० पुरुषांची नसबंदी

पुण्यातल्या फक्त २० पुरुषांची नसबंदी

Next

पुणे : शारीरिक क्षमतांवर विपरीत परिणाम होतो, शस्त्रक्रियेचे ‘साइड इफेक्ट’ मोठे आहेत अशा एक ना अनेक गैरसमजातून, पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण सर्वत्र अत्यल्प असून, पुण्यात तर हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० पर्यंत केवळ २० पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

गैरसमज व नसबंदीसाठी किचकट शस्त्रक्रियेबाबत नाहक भीती यातून हे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच कुटुंब नियोजन करताना महिलांनीच शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने, पुरुष नसबंदीकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.

------

कुटूंब नियोजन कार्यक्रमांतर्गत, लसबंधी करणाऱ्या पुरुषाला ११०० रुपये अनुदान दिले जाते. तसेच त्यासोबत येणाऱ्या व्यक्तीला २०० रुपये दिले जतात. हे दोन्ही पैसे नसबंदी करणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात.

आजमितीला पुणे महापालिकेच्या ५ विविध रुग्णालयांत महिन्यातून एकदा तीन दिवसांचे पुरुष नसबंदी शिबिर आयोजित करण्यात येत आहे. पण एप्रिलपासून डिसेंबर, २० पर्यंत केवळ २० जणांनी ही शस्त्रक्रिया केली आहे. कोरोनामुळे हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु एकंदरीतच दरवर्षी दिलेल्या टारगेटच्या तुलनेत ९ ते १० टक्केच शस्त्रक्रिया होत आहेत. यावर्षी तर १.८ टक्के आहे.

------

शहरात १ एप्रिल ते ३१ मार्च दरम्यान झालेल्या शस्त्रक्रिया

सन २०१६-१७ : १२८

सन २०१७-१८ : १४४

सन २०१८-१९ : ६५

सन २०१९ -२० : ९९

सन २०२०-२१ (डिसेंबरपर्यंत) : २०

--------

स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही अत्यंत सोपी असून याकरिता रुग्णालयात अॅडमिट व्हावे लागत नाही. ही शस्त्रक्रिया झाल्यावर संबंधित पुरुष लागलीच त्याच्या कामावरही जाऊ शकतो. त्यामुळे कुटूंब नियोजन करताना पुरुषांनीदेखील शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

------------

Web Title: Sterilization of only 20 men in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.