स्टिरॉईडमुळे वर्षभरात मधुमेहींची संख्या कोटीने वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:11 AM2021-09-23T04:11:43+5:302021-09-23T04:11:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मधुमेहींची संख्या सर्वांत जास्त आहे. कोरोनावरील उपचारात अपरिहार्यपणे द्याव्या लागलेल्या स्टिरॉईडमुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मधुमेहींची संख्या सर्वांत जास्त आहे. कोरोनावरील उपचारात अपरिहार्यपणे द्याव्या लागलेल्या स्टिरॉईडमुळे येत्या वर्षभरात मधुमेहींची संख्या सुमारे एक कोटीने वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या तीन वर्षांत देशातील एक लाख मधुमेही रुग्णांना औषधमुक्त करण्याचा निर्धार केला आहे, असे अनुयश आरोग्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी सांगितले.
हबार्यु वेलनेस इंडियाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात डॉ. नांदेडकर बोलत होते.
डॉ. नांदेडकर म्हणाले की, भारत मधुमेहाची जागतिक राजधानी झाला असून, भविष्याचा विचार करता या सर्व रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या संख्येने डॉक्टरांची आवश्यकता निर्माण होणार आहे. देशाला मधुमेहमुक्त करण्यासाठी जनआंदोलनाची गरज आहे. या वेळी गेल्या वर्षभरात मधुमेहमुक्त भारत अभियानात योगदान देणाऱ्या नरेंद्र पाटील, विशाल खानवलकर, संदीप मुळे आदींचा गौरव करण्यात आला. श्रुती नांदेडकर यांनी प्रास्ताविक केले. संजय पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.